• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नरेंद्र काळे मित्र परिवारतर्फे गुरुवारी सामुदायिक विवाह सोहळा

by Yes News Marathi
May 6, 2026
in इतर घडामोडी
0
नरेंद्र काळे मित्र परिवारतर्फे गुरुवारी सामुदायिक विवाह सोहळा
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम : पालकमंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे उद्या गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या सामुदायिक विवाह सोहळ्यात १० जोडप्यांचे विवाह होणार आहेत. गुरुवारी टाकळीकर मंगल कार्यालयात दिवसभर विवाहाचे विधी होणार आहेत. तर सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आ.सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी, पुस्तके देण्यात येणार आहेत. सायंकाळी नवविवाहित जोडप्यांची जुळे सोलापूर परिसरातून वरातही काढण्यात येणार आहे. तसेच सोबत येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींकरिता सुग्रास भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले.

या पत्रकार परिषदेस सभागृहनेते नरेंद्र काळे,प्रा देवेंद्र मदने, सिद्धेश्वर बेडगणूर, सदाशिव होनमाने, अरविंद रावळ, उमेश कोळेकर,राज बंडगर आदी उपस्थित होते.

Previous Post

TOP 25 । ‘उजनी’ मायनस मध्ये.. निम्मे पाणी संपले, धरणात 63 TMC पाणीसाठा…

Next Post

पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, पिता पुत्र सुंद्री वादनाने वंदे मातरम जगभर गुंजणार

Next Post
पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, पिता पुत्र सुंद्री वादनाने वंदे मातरम जगभर गुंजणार

पंडीत भिमण्णा जाधव व मास्टर व्येकटेंशकुमार जाधव, पिता पुत्र सुंद्री वादनाने वंदे मातरम जगभर गुंजणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In