विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे, नीलम गोरे, रणजितसिंह मोहिते पाटील,शशिकांत शिंदे, राजेश राठोड, अमोल मेटकरी, दादाराव केचे, संदीप जोशी,संजय केनेकर या नऊ आमदारांचा विधान परिषदेतील सहा वर्षाचा कालावधी तेरा मे रोजी संपुष्टात संपुष्टात येणार आहे. या नऊ जागांसाठी निवडणूक आयोगाने आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यासाठी 23 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत आहे. दोन मे रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार असून चार मे ही उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे आणि 12 मे रोजी मतदान होणार आहे. ही विधानसभेची आमदारकी मिळवण्यासाठी विविध पक्षातून आपापल्या गॉडफादर मार्फत जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे कोण होणार हे नऊ आमदार याचे कोडे महाराष्ट्राला पडले आहे.
