• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अंत्योदय हेच भाजपाच्या कार्याचे अंतिम ध्येय – आ. देवेंद्र कोठे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2026
in इतर घडामोडी
0
अंत्योदय हेच भाजपाच्या कार्याचे अंतिम ध्येय – आ. देवेंद्र कोठे
0
SHARES
2
VIEWS

शहर मध्य भाजपाचा मंडल प्रशिक्षण वर्ग उत्साहात

सोलापूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला अंत्योदयाचा मंत्र प्रत्येक कार्यकर्त्यात रुजवणे आवश्यक आहे. अंत्योदय हेच भाजपाच्या कार्याचे अंतिम ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या पूर्व, मध्य आणि पश्चिम मंडलाचा प्रशिक्षण वर्ग बुधवारी अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात झाला. या प्रशिक्षण वर्गात दिवसभर विविध सत्रांमध्ये भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना तसेच भाजपाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सरल ॲप, नमो ऍप, चॅट जीपीटी त्याचबरोबर विविध समाज माध्यमांचा उपयोग करावा. भाजपाचा कार्यकर्ता प्रशिक्षित असेल तर तो अधिक जोमाने पक्षाचे काम करू शकेल या हेतूने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभर यंदाच्यावर्षी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, असेही आमदार श्री. कोठे यांनी सांगितले.

भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, देश परमवैभवाला नेण्याचे प्रयत्न भाजपाच्या पूर्वजांनी केले. सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, अंत्योदयाची संकल्पना रुजवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मार्गावरून वाटचाल सुरू ठेवली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला एकात्म मानववाद समाजात रुजवण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम करणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. वैचारिक अधिष्ठानावर भाजपाची कार्यपद्धती आखण्यात आली आहे, असेही शहराध्यक्षा तडवळकर याप्रसंगी म्हणाल्या. या सत्राच्या अध्यक्षस्थानी जकप्पा कांबळे आणि रामचंद्र जन्नू होते.

प्रदेश भाजपचे योगेश बाचल यांनी याप्रसंगी कार्यविस्तार आणि कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणत्याही घराण्याच्या जीवावर नव्हे तर कार्यकर्त्यांमुळे हा पक्ष वाढला आहे. पक्षाची संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडल स्तरावर बैठका घ्या, असे आवाहन श्री. बाचल यांनी याप्रसंगी केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी किसन जाधव, विशाल धोत्रे होते. यावेळी माजी नगरसेवक आणि भाजपाचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे एसआयआर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी एसआयआर बाबत मार्गदर्शन केले. यात सत्राच्या अध्यक्षस्थानी महापौर विनायक कोंड्याल आणि रवी बंडे होते.

सोशल मीडिया, एआय, नमो अँप या विषयावर अभिषेक चिंता आणि सिद्धेश्वर टेंगळे स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी दत्ता पाटील होते. तसेच भाजपचा इतिहास या विषयावर प्रा. मोहिनी पत्की यांनी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर म्याकल आणि शिरीष गायकवाड होते. तर भाजपा सरकारची कामगिरी या विषयावर सुधा अल्लीमोरे यांनी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी विजया वड्डेपल्ली आणि बजरंग कुलकर्णी होते.

या प्रशिक्षण वर्गास भाजपचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन आमदार देवेंद्र कोठे बसले चक्क शेवटच्या रांगेत

या प्रशिक्षण शिबिरादरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर बसण्याचा आग्रह केला परंतु “हा भाजपाचा प्रशिक्षण वर्ग आहे. मी आधी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांसमवेतच बसतो” असे संगत आमदार देवेंद्र कोठे यांनी या शिबिरात सगळ्यात शेवटच्या रांगेत बसणे पसंत केले. ‘भाजपामध्ये संघटनेला सर्वाधिक महत्त्व आहे. हे आमदार देवेंद्र कोठे यांनी कृतीतून दाखवून दिले”, अशा शब्दांत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे कौतुक केले.

Previous Post

झेडपीला नव्या कारभाऱ्यासोबत आता नवा सीईओ…!

Next Post

सलग १४ वर्षे १००% निकाल – इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम!

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
सलग १४ वर्षे १००% निकाल – इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम!

सलग १४ वर्षे १००% निकाल - इंडियन मॉडेल स्कूलची परंपरा कायम!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026