• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, March 22, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

by Yes News Marathi
March 22, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेचे सन 2026- 27 या आर्थिक वर्षाचे बजेट मंजूर करण्यासाठी 30 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता अर्थसंकल्पीय सभा आयोजित केली आहे. महापालिका आयुक्तांनी 1383 कोटी रुपयांचे प्रशासकीय बजेट स्थायी समिती सभापती रंजीता चाकते यांच्याकडे सादर केले होते. यात त्यांनी नगरसेवकांना वार्ड वाईज निधी 18 कोटी रुपये ठेवला होता. यात स्थायी समितीने मोठा बदल करून हा निधी 101 कोटी रुपये ठेवला. तसेच झोनचे बजेट कमी केले. याबाबत आता सर्वसाधारण सभेमध्ये आणखी यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून बजेट मंजूर केले जाणार आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना दिलासा देणारे बजेट मंजूर करावे अशी अपेक्षा आहे. जे मिळकतदार बिल आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत स्वतःहून बिले भरतात त्यांना सात टक्के ऐवजी दहा टक्के सूट द्यावी, शहरातील बागा,सुधाराव्यात रस्ते धूळ मुक्त व्हावेत, पाणीपुरवठा सुधारावा, महापालिकेचे उत्पन्न वाढवणारे बीओटीचे प्रकल्प रखडले आहे,याचा आढावा घ्यावा, सुमारे 400 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगार पेन्शनवर खर्च होतात त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढविणारे प्रस्ताव मंजूर करावे, येत्या तीन-चार महिन्यात परिवहन ला नवीन बसेस मिळणार आहे त्याचे योग्य व्यवस्थापन करावे असे कितीतरी विषय शहर विकासाचे आहेत. याबाबत अर्थसंकल्पीय सभेत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In