सोलापूर – सोलापूर जिल्हयात साज-या होणा-या रंगपंचमी उत्सव सन 2026 निमित्त सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याचे मत झाल्याने, महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम १४२ (१) अन्वये रविवार, दि. 08 मार्च 2026 रोजी जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे पत्रकात नमूद आहे.

