• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याचा 1144 कोटींचा आराखडा डीपीडीसी मध्ये मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्याचा 1144 कोटींचा आराखडा डीपीडीसी मध्ये मंजूर
0
SHARES
6
VIEWS

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 साठी 1 हजार 146.34 कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा मंजूर निधी 31 मार्च 2026 पूर्वी खर्च करावा-पालकमंत्री जयकुमार गोरे

अतिवृष्टीने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या दोन हेक्टर पर्यंतच्या शेत जमिनीचे पंचनामे झाले पाहिजेत

बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच शासनाची भूमिका, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करावे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री महोदय यांच्यासह सर्व समिती सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली

सोलापूर – जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 साठी राज्य शासनाने ठरवून दिलेली आर्थिक मर्यादा 693.90 कोटी होती, त्यामध्ये 300 कोटींची अतिरिक्त मागणी सह 993.90 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 147 कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र 5 कोटी 44 लाख 54 हजार असा एकूण 1 हजार 146 कोटी 34 लाख 54 हजाराचा प्रारूप आराखडा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्य केला. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा मंजूर निधी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 मार्च 2026 पूर्वी खर्च करावा व हा निधी व्यतगत होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष देशमुख, राजू खरे, समाधान आवताडे, उत्तम जानकर, उत्तम जानकर, अभिजीत पाटील, प्र. जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांच्या सह सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. 

 पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीने सन 2026-27 चा मंजूर केलेल्या प्रारूप आराखड्या अंतर्गत सर्वसाधारण योजनेमध्ये कृषी व संलग्न सेवा 47.82 कोटी, ग्रामीण क्षेत्राच्या विकास योजना 68 कोटी, जलसंधारण विभाग योजना 48.50 कोटी, ऊर्जा विकास व अपारंपारिक ऊर्जा 65 कोटी, शिक्षण विभाग 40 कोटी, महिला व बाल विकास 19.78 कोटी,  आरोग्य सेवांचे बळकटीकरण 73.40 कोटी, नगर विकासाच्या योजना 113 कोटी, रस्ते व परिवहन 67 कोटी, पर्यटन तीर्थक्षेत्र, गड किल्ले, संरक्षित स्मारके यांचे संवर्धन व विकास 47.3 कोटी, पोलीस व तुरुंग व्यवस्थेचे बळकटीकरण 19.78 कोटी, क्रीडा विभाग 7 कोटी असा निधी ठेवण्यात आलेला आहे.तर अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत कृषी व संलग्न सेवा 7.23 कोटी, ऊर्जा 4.65 कोटी, सामाजिक व सामाजिक सेवा 128.17 कोटी, उद्योग व खाणकाम 34 लाख, नाविन्यपूर्ण योजना 5.28 कोटी, समाज कल्याण कार्यालय बळकटीकरण 73 लाख आणि आदिवासी उपयोजना अंतर्गत 5 कोटी 44 लाख 54 हजाराचा निधी कृषी, ऊर्जा, सामाजिक सेवा, रस्ते व पूल, नाविन्यपूर्ण योजना साठी ठेवण्यात आलेला आहे.

बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे-पालकमंत्री
मागील वर्षी माहे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तसेच शेतीचे नुकसान झालेले होते त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी पंचनामे बाबत अनेक तक्रारी मांडल्या त्यावर बोलताना पालकमंत्री श्री गोरे यांनी अतिवृष्टी व पुरामुळे जमीन खरडून गेलेली असल्यास त्या शेतकऱ्यांच्या दोन हेक्टर शेतीचे पंचनामे करण्याबाबत शासनाने निर्देशित केलेले असून प्रशासनाने त्याप्रमाणे पंचनामे करून अहवाल सादर करावेत. पूर व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची भूमिका असून प्रशासनाने गांभीर्यपूर्वक तक्रारींचे निवारण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निर्देश त्यांनी दिले.

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होईल यासाठी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या विजेचे खांब व विजेची लाईन तसेच डीपी याची तात्काळ दुरुस्तीबाबत यापूर्वीच निर्देश दिलेले होते, त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात पालकमंत्री कार्यालय तसेच संबंधित लोकप्रतिनिधी यांना सादर करावा असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी दिले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे वाहने तपासणीसाठी थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत, तरी यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहनावर या पुढील काळात कारवाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

मंगळवेढा येथील आश्रमशाळेला जिल्हाधिकारी यांनी अचानक भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना शाळेकडून चांगल्या प्रकारचे जेवण तसेच अन्य सुविधा उपलब्ध केले जात आहेत का याची तपासणी करावी. यामध्ये कोणीही हलगर्जीपणा करत असेल तर संबंधितावर खडक कारवाई प्रस्तावित करावे असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी यांच्याकडून विविध मागण्या तसेच सूचना-
आमदार सुभाष देशमुख, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण पाटील यांनी नियोजन समितीमध्ये विविध मागण्या, सूचना मांडल्या तसेच त्यांच्या मतदारसंघात विकास कामासाठी निधीची मागणी केली. यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पीक व जमिनीचे नुकसान अनुदान मिळणे, खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीत ते पुन्हा करणे, शाळा दुरुस्तीसाठी निधी मिळणे, सोलापूर शहराला रात्री बारा ते पहाटे पाच या कालावधीत पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे, सोलापूर शहरातील वन विहाराचा विकास पर्यटन केंद्र म्हणून करावा, वीज कंपनीकडून रोहित्र दुरुस्ती तात्काळ करून मिळावी, ग्रामीण भागातील अवैध धंद्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, सोलापूर शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय मान्यता रद्द झाली आहे ते केंद्रीय समितीकडून मिळण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे, जिल्हा परिषदेच्या महापालिका हद्द वाढ भागातील शाळांना निधी मिळावा, सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्याचा विकास व संवर्धन नळदुर्ग किल्ल्याप्रमाणे करावा, तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी मिळवा, कामे दर्जेदार करावीत तसेच आश्रम शाळांची तपासणी करून तेथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवण मिळाले पाहिजे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात सिजेरियनची व्यवस्था करावी व अन्य आरोग्यदृष्ट्या अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून मिळाल्या पाहिजेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा नियोजन बैठकीतील विषयांचे वाचन केले. यामध्ये 1.दि. 16 मे 2025 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व कार्यवाही अहवालास मान्यता. 2. जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत जानेवारी 2026 अखेरच्या खर्चाचा आढावा. 3. जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता. 4.अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा, आदी विषयावर चर्चा करण्यात आली. तर शेवटी बैठकीस उपस्थित मान्यवरांचे आभार सहाय्यक नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांनी मानले.

    Previous Post

    राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता

    Next Post

    प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद

    Related Posts

    मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
    इतर घडामोडी

    मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

    October 14, 2026
    दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
    इतर घडामोडी

    दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

    October 14, 2026
    पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
    इतर घडामोडी

    पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

    October 14, 2026
    राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
    इतर घडामोडी

    राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

    October 14, 2026
    उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
    इतर घडामोडी

    उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

    October 14, 2026
    दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
    इतर घडामोडी

    दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

    October 13, 2026
    Next Post
    प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद

    प्रभाग चलो अभियानातून आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची संवाद

    ताज्या बातम्या

    मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

    मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

    October 14, 2026
    दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

    दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

    October 14, 2026
    पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

    पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

    October 14, 2026

    टॉप ५ बातम्या

    • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

      0 shares
      Share 0 Tweet 0
    पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026