• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपच्या बालेकिल्ल्याला सेनेचे नवे शिलेदार सुरुंग लावणार का?

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2026
in इतर घडामोडी
0
भाजपच्या बालेकिल्ल्याला सेनेचे नवे शिलेदार सुरुंग लावणार का?
0
SHARES
2
VIEWS

अक्कलकोटच्या पारंपारिक लढाईकडे राज्याचे लक्ष

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या राजकीय कारकीर्दीचा उतरता आलेख सुरू झाल्यानंतर भाजपाने मोदींच्या लाटेत जोरदार मुसंडी मारत अक्कलकोट काबीज केले.आज अक्कलकोट भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा त्याग करत प्रथम भाजपाच्या लाटेवर स्वार होण्याचा निर्णय घेतला, परंतु राजकीय वादळात ही लाट अनुकूल नसल्याचे दिसताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धनुष्यबाण हातात घेत राजकीय रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि रणांगणात उतरले देखील!
नगरपरिषद आणि पंचायतीमध्ये भाजपाचे कमळ फुललेले असताना आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत.या निवडणुकीत भाजपा पुनरावृत्ती करेल की नवे शस्त्र हाती धरलेले सिद्धाराम म्हेत्रे आपल्या धनुष्यबाणातील अमोघ बाण सोडत भाजपाचा अभेद्य बालेकिल्ला भेदतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस नाममात्र असून खरी लढत सत्ताधारी भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शिंदेसेनेतील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातच आहे.या निवडणुकीत कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांनी परिवारातील सदस्यांना तिकीटरूपी वस्त्र दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
चपळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अर्धांगिनी शांभवी कल्याणशेट्टी यांना रिंगणात उतरवले आहे, तर चपळगाव पंचायत समिती गणातून चुलत बंधू सागर कल्याणशेट्टी यांना षढ्ढू ठोकायला लावले आहे.दुसरीकडे सलगर जिल्हा परिषद गटातून सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपले पुत्र शिवराज म्हेत्रे यांना धनुष्यबाण देत लढायला उभे केले आहे, तर तोळणूर पंचायत समिती गणातून कन्या शितल म्हेत्रे यांना लढवय्याची वस्त्रे प्रदान केली आहेत.

काँग्रेसचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांची चुलत बहीण श्रुती पाटील पंचायत समिती गणातून, तर पूर्वी भाजपाच्या तंबुतील लढवय्ये सैनिक आनंद तानवडे तिकीटरूपी जहागिरदारी न मिळाल्याने आपल्या एकनिष्ठ समर्थकांसह कट्टर विरोधक असलेल्या शिंदेसेनेचे सेनापती म्हेत्रे यांच्या छावणीत दाखल झाले. आनंद तानवडेंचे चुलत बंधू प्रवीण तानवडे यांना वागदरी जिल्हा परिषद गटातून मोहिमेवर पाठवण्यात आले आहे.

अशाप्रकारे अक्कलकोट तालुक्यातील या निवडणुकीत ‘कुटुंब केंद्रीय राजकारण’ हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे.भाजपाने जिल्हा परिषदेसाठी सहा उमेदवार देऊ केले असून पंचायत समितीत 12 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेचे जिल्हा परिषदेत चार तर पंचायत समितीमध्ये आठ उमेदवार रिंगणात आहेत.काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी एक तर पंचायत समितीसाठी दोन उमेदवार नशीब आजमावत आहेत.तर दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून जिल्हा परिषदेत एक तर पंचायत समितीमध्ये दोन उमेदवार रिंगणात आहेत.एकंदरीत अक्कलकोटमधील ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूू सचिन कल्याणशेट्टी आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिली जात आहे.

Previous Post

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने 500 कोटी व्यवसायाचा टप्पा केला पार – चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी

Next Post

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत दिली माहिती

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत दिली माहिती

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी रु २३,९२६ कोटींच्या विक्रमी अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत दिली माहिती

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026