सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी तब्बल 836 ट्रक कांद्याचे आवक झाली.यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक आवक ठरली आहे.यार्डामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.आवक अधिक आल्याने बाजार समितीमध्ये कांदा उतरण्यास वेळ लागला, त्यामुळे लिलाव प्रक्रियेलाही उशीर झाला. तसेच कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्येनाराजीचा सूर उमटला आहे.या आवक वाढीमुळे तब्बल सात कोटी 52 लाख 69 हजार रुपयांची उलाढाल कांदा बाजारात झाली.

