येत्या 8 फेब्रुवारीला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी पार पडणार आहे.या संदर्भात सीटीईटीच्या अधिकृत वेबसाईटवर आज सर्व परीक्षार्थींचे केंद्रस्थान डिक्लेअर करण्यात आले.
या डिक्लेरेशन फॉर्म मध्ये परीक्षा दिनांक देखील बदलण्यात आला असून शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी परीक्षा दिनांक असल्याचे नमूद केले आहे.त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम वाढला आहे. सोलापुरातील बहुतांश परीक्षार्थींना मुंबई हे परीक्षा केंद्र म्हणून आलेले आहे.या परीक्षार्थींच्या माहिती द्वारे ज्या परीक्षार्थींनी पेपर एक अथवा पेपर दोन यापैकी एखादा पेपर निवडला आहे अशा परीक्षार्थींचे केंद्र मुंबई येथे आल्याचे समजते.तर ज्या परीक्षार्थींनी दोन्ही पेपर निवडले आहेत त्यांचे परीक्षा केंद्र सोलापुरातच असल्याचे कळते.तसेच महिला परीक्षार्थींचे केंद्र सोलापूर आल्याचे दिसून आले आहे.ल जेव्हा सोलापूरमध्ये केंद्र आहे तेव्हा पेपर एक किंवा पेपर दोन साठी मुंबई केंद्र का ? असा संंतप्त सवाल मुंबई केंद्र आलेल्या परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे.मुळातच बेरोजगार असणाऱ्या उमेदवारांना मुंबईसाठी जाण्या-येण्यात किमान 5. हजारच्या वर खर्च अपेक्षित आहे.या आर्थिक नुकसानीमुळे काही उमेदवारांनी परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे

