• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची भक्कम फलंदाजी, दिवसाखेर 4 बाद 403 धावा करत 194 ची आघाडी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 24, 2026
in इतर घडामोडी
0
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची भक्कम फलंदाजी, दिवसाखेर 4 बाद 403 धावा करत 194 ची आघाडी
0
SHARES
5
VIEWS

दिग्विजय पाटील चे नाबाद शतक
हर्ष मोगावीरा व अनिरुद्ध साबळे यांची शतके थोडक्यात हुकली
कर्णधार सचिन धस चे दमदार अर्धशतक तर अमित अलीचे 3 बळी

सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर काल पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा ह्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायुडू चषकातील चौथ्या फेरीच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने पहिल्या डावात 103 षटकात 4 बाद 403 धावा केल्या असून 194 धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळच्या सत्रात कालची नाबाद जोडी हर्ष मोगावीरा आणि अनिरुद्ध साबळे यांनी प्रथम अर्धशतकी आणि मग संयमी फलंदाजी करत शतकी सलामी दिली. दोघांनी त्रिपुराचीगोलंदाजी निष्प्रभ करत जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 48 षटकात 165 धावा केल्या, तेंव्हा हर्ष 77 तर अनिरुद्ध 83 धावांवर नाबाद होते. जेवणानंतर 4 षटकात दोघेही चौकार षटकार लगावत नव्वदीच्या घरात पोचले पण त्रिपुराच्या अमित अली ने त्याच्या लागोपाठच्या षटकात प्रथम अनिरुद्ध साबळे (91 धावा, 162 चेंडू, 12 चौकार) याला आनंध भौमिक द्वारे व हर्ष मोगावीरा (95 धावा, 159 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार) याला यष्टिरक्षक दीपजोय कडे झेल देण्यास भाग पाडून जोडी फोडली व त्यामुळे दोघांचेही शतक थोडक्यात हुकले.त्यानंतर आलेला कर्णधार सचिन धस आणि भरवशाचा फलंदाज दिग्विजय पाटील यांनी उपयुक्त अशी संयमी फलंदाजी करत चहापानाला खेळ थांबला तेंव्हा 2 बाद 290 धावा केल्या.

शेवटच्या सत्रात धावफलक हलता ठेवत 105 धावांची भागीदारी रचली. त्यात दोघांनीही आपापली अर्धशतके साजरी केली. पण 299 धावा झाल्या असताना पुन्हा एकदा अमित अली याने सचिनला त्रिफळाचित करत सलग तिसरा बळी मिळवला. सचिनने 93 चेंडू मध्ये 4 चौकार, 2 षटकार सह 54 धावा केल्या.
त्यानंतर दिग्विजय याने साहिल पारख याचे सोबत ताबडतोब फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचत धावसंख्या 356 पर्यंत नेली, तेव्हा अर्काजीत रॉय ने साहिल याला त्रिफळा बाद केले.

त्यानंतर आलेल्या किरण चोरमले सोबत दिग्विजय याने अतिशय उत्तम फलंदाजी करत 9 चौकार, 3 षटकार लगावत नवीन वर्षात पहिले शतक साजरे केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा पहिल्या डावात महाराष्ट्र संघाने 194 धावांची आघाडी घेतली असून दिग्विजय 112 वर तर किरण 29 वर नाबाद असून उद्या नाबाद जोडी व उर्वरित फलंदाज आणखी किती धावा जोडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून जास्तीत धावा करून एक भक्कम धावसंख्या उभा करण्याचे संघाचे उद्दिष्ट्य असल्याचे दिसून येते.

Previous Post

सोलार साहित्य चोरी प्रकरणी १०.७८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

सीटीईटी परीक्षा केंद्रप्रकरणी सोलापुरातील परीक्षार्थी नाराज, संतप्त व संभ्रमावस्थेत

Related Posts

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
Next Post
सीटीईटी परीक्षा केंद्रप्रकरणी सोलापुरातील परीक्षार्थी नाराज, संतप्त व संभ्रमावस्थेत

सीटीईटी परीक्षा केंद्रप्रकरणी सोलापुरातील परीक्षार्थी नाराज, संतप्त व संभ्रमावस्थेत

ताज्या बातम्या

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026