आज पासून प्रजासत्ताक दिनापर्यंत सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटन स्थळे ज्याप्रमाणे गजबजणार आहेत त्याचप्रमाणे सोलापूर शहराला देखील सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे सोलापुरात सुरू असलेली गड्डा यात्रा… शेतशिवारामध्ये रंगलेल्या हुरडा पार्ट्या… आणि सुट्ट्या निमित्त पुणे, मुंबईचे तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी आलेले लाखो भाविक यामुळे सोलापुरातील सर्व हॉटेल आणि लॉजिस हाऊसफुल झाले आहेत. सोलापुरातील सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह, सात रस्ता येथील हॉटेल सेंट्रल पॉईंट पासून ते बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमधील सर्वच्या सर्व रूम बुक आहेत. शहरातील कोणत्याच हॉटेलला आज किंवा रूम उद्या मिळणार नाही यावरूनच सोलापूरच्या प्रगतीचा आणि सोलापुरात येणाऱ्या पर्यटकांचा अंदाज येतो. सोलापूरच्या अवतीभवती झालेले महामार्ग .. रेल्वेची चांगली कनेक्टिव्हिटी आणि दररोज सुरू झालेली सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा यामुळे सोलापूरला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले आहेत . सोलापूरची महापालिका बहुमताने भाजप आणि ताब्यात घेतली. आता धूळ मुक्त, अतिक्रमण मुक्त शहर करून वाहतुकीचा व्यवस्थित सर्वकष आराखडा केला तर सोलापूरच्या प्रगतीला चार चांद लागतील हे नक्की..

