• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात अवैध शस्त्रसाठ्यावर गुन्हे शाखेचा धडक कारवाईचा बडगा; तीन आरोपी अटकेत; दोन देशी बनावटीची पिस्तुले, ८ काडतुसे व दुचाकी जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात अवैध शस्त्रसाठ्यावर गुन्हे शाखेचा धडक कारवाईचा बडगा; तीन आरोपी अटकेत; दोन देशी बनावटीची पिस्तुले, ८ काडतुसे व दुचाकी जप्त
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तीन इसमांना अटक करून त्यांच्याकडून अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली . दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, डी.आर.एम. रेल्वे ऑफिसजवळील रेल्वे कॉलनीच्या कंपाउंडलगत मोकळ्या जागेत काही इसम संशयास्पदरीत्या थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तुले आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय काबे व त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून आलेल्या तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांची नावे पुढीलप्रमाणे निष्पन्न झाली – महंमदरफिक लालसाब जाटगर (वय २६, व्यवसाय – मजुरी, रा. जाटगर वस्ती, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजयपूर, कर्नाटक) राजा गुरुनाथ सौदागर (वय २६, व्यवसाय – बेकार, रा. भारत नगर, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजयपूर, कर्नाटक) प्रदीप सूर्यकांत काळमोर (वय ३५, व्यवसाय – मेकॅनिक, रा. इंदिरा नगर, कडम वस्ती, लोणी काळभोर, पुणे) झडतीदरम्यान आरोपी राजा सौदागर याच्या कंबरेजवळ लपवलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे, तर प्रदीप काळमोर याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकलही जप्त करण्यात आली.

या तिघांकडे शस्त्र परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून, सदर शस्त्रे विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु. र. नं. २८/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २ देशी बनावटीची पिस्तुले, ८ काडतुसे व मोटारसायकल असा सुमारे २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सहपोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपआयुक्त राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेलके, राजू मुंडाळ, महेश रोकडे, अंकुश मोसले, सुभाष मुंडे, सिद्धराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सागर पाटील, कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळू काळे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Previous Post

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

Next Post

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026