• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महापालिका प्रशासनावर जिल्हाधिकारी नाराज, शासनाला पाठविणार अहवाल

by Yes News Marathi
January 8, 2026
in मुख्य बातमी
0
महापालिका प्रशासनावर जिल्हाधिकारी नाराज, शासनाला पाठविणार अहवाल
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026 आढावा बैठकीस महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने बैठक रद्द

श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची नाराजी

सोलापूर – श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत श्री सिद्धेश्वर महायात्रा अनुषंगाने आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता नियोजन भवन सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीस दुपारी 3.30 वाजेपर्यंत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच इन्सिडेंट कमांडर तथा नगर अभियंता श्रीमती सारिका आकुलवार यांची अनुपस्थिती होती. श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 या महत्त्वपूर्ण बैठकीची वेळ होऊन अर्धा तास झाला तरी महापालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी आले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती बाबत नाराजी व्यक्त करून सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने आयोजित आजची बैठक रद्द करून तसा अहवाल राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव गृह विभाग आणि संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना पाठवण्याबाबतचे निर्देश दिले.
श्री सिद्धेश्वर यात्रा 2026 या बैठकीस सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर समितीच्या पंच कमिटीचे पंच उपस्थित होते. परंतु या यात्रेची संपूर्ण जबाबदारी असलेल्या सोलापूर महापालिकेचे अधिकारी तसेच इन्सिडेंट कमांडर म्हणून जबाबदारी असलेल्या श्रीमती अकुलवार अनुपस्थित होत्या. सोलापूर जिल्ह्याचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची महत्त्वपूर्ण यात्रा होत असून आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीस महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवलेला निष्काळजीपणा अत्यंत चुकीचा असून याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव गृह विभाग तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे संचालक यांना तत्काळ पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Previous Post

प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी

Next Post

दहा तारखेला होणाऱ्या देवा भाऊंच्या सभेकडे सोलापूरकरांचे लागले लक्ष…

Next Post
दहा तारखेला होणाऱ्या देवा भाऊंच्या सभेकडे सोलापूरकरांचे लागले लक्ष…

दहा तारखेला होणाऱ्या देवा भाऊंच्या सभेकडे सोलापूरकरांचे लागले लक्ष…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In