• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 8, 2026
in मुख्य बातमी
0
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी
0
SHARES
1
VIEWS

आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह : औक्षण आणि पुष्पवृष्टीने झाले उमेदवारांचे स्वागत

सोलापूर : ढोल ताशांचा गजर, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औक्षण, पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला.

चौत्रा पुणे नाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पुरुषोत्तम बरडे, प्रभाग ७ चे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे, उमेदवार आनंद कोलारकर, पद्माकर काळे, उत्तरा बरडे – बचुटे, श्रद्धा पवार, भाजपच्या सरचिटणीस सुद्धा अळीमोरे, सतीश कुदळे, किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले,
प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार विजयकुमार देशमुख, मी स्वतः, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, पद्माकर काळे आणि प्रभागात राहणारे सर्व दिगग्ज नेते एकत्र आले आहेत. प्रभाग क्रमांक ७ मध्ये निघालेली भव्य पदयात्रा ही या प्रभागातील भाजपच्या विजयाची नांदी आहे. २०१२ सालापासून १० वर्षे या प्रभागाने मला नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याच जोरावर मी प्रभागासह शहरात विविध ठिकाणी विकास करू शकलो. प्रभाग क्रमांक ७ हे माझे कुटुंब आहे. नगरसेवक असताना या प्रभागासाठी भरघोस निधी आणण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला आहे. सध्या शहरात भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर शहराला भक्कम पाठबळ आहे. या जोरावर प्रभाग क्रमांक ७ सह शहरासाठी भरघोस निधी आणून शहराचा कायापालट करण्यासाठी भाजपा सज्ज आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.

पारंपारिक ढोल ताशे, हलग्यांचा कडकडाट, हाती भाजपाचे झेंडे, गळ्यात भाजपाचे शेले, ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ च्या घोषणांमुळे प्रभाग क्रमांक ७ परिसर भाजपमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या छबी असलेले फलक धरले होते.

हजारोंच्या गर्दीत जुना पुणे नाका येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा हांडे प्लॉट, अवंती नगर, रो हाऊस भाग एक, भाग दोन, थोबडे नगर, निराळे वस्ती, जुनी पोलीस लाईन, दूध पंढरी परिसर मार्गे राघवेंद्र मठ परिसरात विसर्जित झाली.

भाजप उमेदवारांच्या पदयात्रेचे प्रभाग क्रमांक ७ मधील मतदारांनी जागोजागी उत्स्फूर्त स्वागत केले. नागरिकांनी घरासमोर कमळ चिन्हाच्या रांगोळ्या तसेच फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. उमेदवारांचे औक्षण करत पुष्पवृष्टी करून आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. बुधवारी प्रभाग क्रमांक ७ मध्ये झालेली भाजपाची प्रचंड मोठी पदयात्रा विरोधकांना धडकी भरवणारी असून ही भाजपाच्या प्रभाग क्रमांक ७ मधील विजयाची नांदी आहे, असे मतदारांनी सांगितले.

Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अद्ययावत भिगवण गुड्स शेडमध्ये नवीन ‘स्टील बार’ हाताळण्यास सुरुवात केली

Next Post

महापालिका प्रशासनावर जिल्हाधिकारी नाराज, शासनाला पाठविणार अहवाल

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
महापालिका प्रशासनावर जिल्हाधिकारी नाराज, शासनाला पाठविणार अहवाल

महापालिका प्रशासनावर जिल्हाधिकारी नाराज, शासनाला पाठविणार अहवाल

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026