• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संशोधनाच्या बळावरच ‘विकसित भारत’ साकार होणार – डॉ. पी. एस. पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
January 5, 2026
in इतर घडामोडी
0
संशोधनाच्या बळावरच ‘विकसित भारत’ साकार होणार – डॉ. पी. एस. पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन

सोलापूर – जिज्ञासू वृत्ती, कल्पनाशक्ती आणि दूरदृष्टी यांच्या बळावरच दर्जेदार संशोधन घडू शकते. संशोधनाच्या माध्यमातूनच ‘विकसित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येईल. त्यामुळे संशोधकांनी विविध विषयांवर काम करताना योग्य संशोधन साहित्य निवडावे आणि त्या साहित्याचा समाजोपयोगी व तंत्रज्ञानाभिमुख वापर कसा होईल, याचा सखोल विचार करावा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फंक्शनल मटेरियल्स अँड अ‍ॅप्लिकेशन्स’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. बी. जे. लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत समन्वयक डॉ. विकास पाटील यांनी केले.

डॉ. पी. एस. पाटील पुढे म्हणाले की, फंक्शनल मटेरियल्स हा आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा राष्ट्रीय परिषदांमुळे संशोधकांना नवे विचार, नवी दिशा आणि परस्पर संवादाची संधी मिळते. संशोधन करताना विज्ञान व तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून नवोन्मेष कसा साधता येईल आणि त्या संशोधनाचा उद्योग, समाज व देशाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग होईल, याकडे संशोधकांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, फंक्शनल मटेरियल्स हे मानवी जीवनाच्या प्रत्येक घटकाशी निगडित आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये विविध प्रकारच्या मटेरियल्सचा वापर झालेला असतो. त्यामुळे भौतिकशास्त्राचे अभ्यासक आणि संशोधक यांनी संशोधन करताना समाजाला अधिकाधिक उपयोग होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. देशाच्या विकासामध्ये संशोधनाचा मोठा वाटा असून संशोधनाच्या माध्यमातूनच आपण जागतिक स्तरावर पुढे जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

या राष्ट्रीय परिषदेत देशभरातून ३०० हून अधिक अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परिषदेत डॉ. एस. एच. पवार, डॉ. प्रकाश वडगावकर, डॉ. राजीव जोशी, डॉ. ए. एन. जाधव, डॉ. एस. बी. सरताळे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. अनिल घनवट यांच्यासह अनेक नामवंत तज्ज्ञ उपस्थित होते.

परिषदेदरम्यान संशोधन पेपर सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी आपले नवसंशोधन मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्वी पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. उजमा बांगी यांनी मानले.

Previous Post

सोलापूर पुणे महामार्गावर शेटफळ जवळ अपघात; दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

सोलापुरात ‘मुका’ प्रचार..उमेदवारांच्या शेकडो रिक्षा इंद्रभुवनात..!

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
सोलापुरात ‘मुका’ प्रचार..उमेदवारांच्या शेकडो रिक्षा इंद्रभुवनात..!

सोलापुरात 'मुका' प्रचार..उमेदवारांच्या शेकडो रिक्षा इंद्रभुवनात..!

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026