• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाशिक – सोलापूर – अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी; केंद्राचा निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
December 31, 2025
in मुख्य बातमी
0
नाशिक – सोलापूर – अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी; केंद्राचा निर्णय
0
SHARES
13
VIEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देसातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या 2 प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. सुमारे 20 हजार 668 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत महाराष्ट्रातील नाशिक – सोलापूर – अक्कलकोट या 374 किलोमीटरच्या कॉरिडोरसह ओडिशातील NH-326 या 206 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र अधिक गतीमान होण्यास मदत मिळणार आहे.

नाशिक – सोलापूर – अक्कलकोट कॉरिडोर हा 19, 142 कोटींचा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) या कॉरिडोरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडोर नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडत पुढे आंध्र प्रदेशातील कुर्नुलपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत करेल. हा उपक्रम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

6 पदरी एक्सेस कंट्रोल्ड कॉरिडोर

उल्लेखनीय बाब म्हणजे प्रस्तावित ग्रीनफिल्ड कॉरिडोरला दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे (वाढवन पोर्ट इंटरचेंज), आग्रा – मुंबई कॉरिडोर (एनच-60 – अडेगाव जंक्शन) व समृद्धी महामार्ग (पांगरी, नाशिकलगत) यांच्याशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा 6 पदरी एक्सेस कंट्रोल्ड कॉरिडोरमुळे देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत थेट वाहतुक सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल 17 तासांची बचत होणार असून, 201 किलोमीटरचे अंतरही कमी होणार आहे.

प्रस्तावित प्रकल्पातून 251.06 लाख मॅन – डे थेट रोजगार, 313.83 लाख मॅन – डे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. तसेच या महामार्गालगतच्या परिसरातील आर्थिक उलाढाल वाढून नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.

2 टप्प्यांत बांधला जाणार महामार्ग

यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिक ते अक्कलकोट महामार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा 2 टप्प्यांत बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर टप्पा 152 किमीचा, तर अहिल्यानगर ते अक्कलकोट टप्पा 222 किमी असेल. 374 किमीचा हा महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ 4 तासांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी तब्बल 9 तास लागतात.

सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर 2 तासात पार करता येणार आहे. चेन्नई ते सुरत महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे दिल्लीकडे जाणेही सोपे होणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली निर्णयाची माहिती

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, पहिला प्रकल्प नाशिक आणि सोलापूरला जोडणारा सहा लेनचा अॅक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवे आहे. एकप्रकारे हा प्रकल्प विकसित भारताच्या स्वर्णित चतुर्भुजचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरने मोठी प्रगती केली आहे. त्यानंतर आता हा मुंबई-चेन्नई कॉरिडॉर आहे. आज ज्या सेक्शनला मंजूरी मिळाली तो नाशिक ते अक्कलकोट असा आहे. यापुढे हा कॉरिडॉर कुरनूल, कडप्पा, चेन्नईपर्यंत वाढवला जाईल. तूर्त आज नाशिक-सोलापूर कॉरिडॉरला मंजूरी देण्यात आली आहे.

Previous Post

सोलापुरात 55 कोटींची लाईट बिल थकबाकी

Next Post

आ. देवेंद्र कोठेंचेच फिफ्टी प्लस उमेदवार..माने गटाला 4 जागा, मालक- बापूचे खच्चीकरण.!

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
आ. देवेंद्र कोठेंचेच फिफ्टी प्लस उमेदवार..माने गटाला 4 जागा, मालक- बापूचे खच्चीकरण.!

आ. देवेंद्र कोठेंचेच फिफ्टी प्लस उमेदवार..माने गटाला 4 जागा, मालक- बापूचे खच्चीकरण.!

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026