उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सलग दोन टर्म महापौर राहिलेल्या मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाराजी नाट्याने रंगत वाढवली आहे. आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या मिनाक्षी शिंदे यांनी जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. अंतर्गत धुसफूसीचा हा उद्रेक असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे साठी हा खूप मोठा धक्का आहे.

