उबाठाच्या शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात केवळ कुर्डूवाडी येथे नगरपरिषदेचा एकमेव गड राखता आला असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जयश्री भिसे यांनी 6624 मतांनी विजय मिळवला.अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रणित अपक्ष उमेदवार सुरेखा गोरे यांना 5969 मतांवर समाधान मानावे लागले.भारतीय जनता पार्टीच्या माधुरी गोरे या 1728 मतांनी तृतीय स्थानी राहिल्या. असून शिंदेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पिछाडीवर राहिली आहे.

