• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

डॉ. लालासाहेब तांबडे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत मानाचा “इनोव्हेशन अवॉर्ड–2025” प्रदान

by Yes News Marathi
December 16, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. लालासाहेब तांबडे यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत मानाचा “इनोव्हेशन अवॉर्ड–2025” प्रदान
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब रावसाहेब तांबडे यांना त्यांच्या उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित “इनोव्हेशन अवॉर्ड–2025” ने सन्मानित करण्यात आले. हा भव्य सन्मान नवी दिल्ली येथे 15 डिसेंबर 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

“International Conference on Agricultural Resurgence–2025” या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भारतीय कृषी कौशल्य परिषद, नवी दिल्ली; गुजरात प्राकृतिक शेती विज्ञान विद्यापीठ, आनंद; आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधार केंद्र; भारतीय अनुवंशिकी व पीक प्रजनन सोसायटी, नवी दिल्ली; तसेच हिंदुस्तान कृषी संशोधन कल्याण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रत्यक्ष व हायब्रीड पद्धतीने करण्यात आले होते.

डॉ. तांबडे यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार कार्यासाठी, विशेषतः “जिजाई नॅनो किचन गार्डन” या शंभर टक्के सेंद्रिय, नवीकरणीय मॉडेलच्या विकास व प्रसारासाठी त्यांना हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलद्वारे अत्यल्प जागेत, घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला उत्पादन शक्य होत असून आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळत आहे.

परिषदेचे उद्घाटन माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत जी यांच्या हस्ते, तसेच डॉ. पी. के. सिंग ,डॉ. सत्येंद्रसिंग आर्य, डॉ. सी. के. टिंबाडिया आदी मान्यवरांच्या उपस्थितीत 13 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या तांत्रिक सत्रात डॉ. लालासाहेब तांबडे यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार कार्याचे शास्त्रशुद्ध सादरीकरण केले. जिजाई नॅनो किचन गार्डन व नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींच्या प्रभावी वापरावर त्यांनी केलेले सखोल विवेचन उपस्थित मान्यवरांनी विशेष प्रशंसेस पात्र ठरवले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

या पुरस्काराबद्दल भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपमहानिदेशक डॉ. राजवीर सिंग, शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रदीप गायकवाड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. सूर्य गुंजाळ, विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, आयसीएआरचे संचालक, सामाजिक मान्यवर तसेच शेतकरी बांधवांनी डॉ. तांबडे यांचे अभिनंदन केले आहे.

या प्रसंगी डॉ. तांबडे यांनी हा सन्मान शेतकरी बांधवांना अर्पण करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Previous Post

मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्र न्यायालयाकडून 2 वर्षे कारावासाची शिक्षा कायम, अटकेची टांगती तलवार ?

Next Post

सोलापूर जिल्हा पुरुष व महिला खो-खो संघ जाहीर…

Next Post
सोलापूर जिल्हा पुरुष व महिला खो-खो संघ जाहीर…

सोलापूर जिल्हा पुरुष व महिला खो-खो संघ जाहीर…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In