सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नॉर्थकोट शाळा येथे निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी एकूण 8 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नॉर्थकोट शाळेच्या आवारात 26 प्रभागांची निवडणूक कार्यालये असतील.उमेदवारांना येथे उमेदवारी अर्ज भरता येईल. अर्ज छाननी, चिन्ह वाटप झाल्यानंतर उर्वरित कामकाज इतरत्र होणार आहे.

