सोलापूरकरांना 103 वर्ष सेवा देणारा इंग्रज कालीन दमानी नगर येथील रेल्वे ब्रिज पाडकामाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या ब्रिजच्या खाली 200 टनी वजन उचलू शकणारे तीन बाहुबली क्रेन उभा करण्यात आली आहेत. यासाठी रेल्वेने आज सकाळी साडेआठ ते साडेसात असा अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे. हुतात्मा आणि सिद्धेश्वर या सोलापूरच्या हक्काच्या ट्रेन वगळता नऊ ट्रेन रद्द करण्यात आले आहेत अनेक ट्रेन वळविण्यात आल्या आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून गॅस कटरच्या सहाय्याने हा ब्रिज तोडण्याचे काम सुरू असून झाले असून तो क्रेनच्या सहाय्याने उचलून रेल्वे पटरी वरून बाजूला ठेवला जाणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर रेल्वे, आणि महामार्ग विभागाची यंत्रणा यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे आज पासून 19 डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने या ब्रिजच्या कामानिमित्ताने रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे . रेल्वे ट्रॅकच्या वरील ब्रिजचा आज मुख्य भाग काढला जाणार आहे . 103 वर्ष जुना हा रेल्वे ब्रिज आज सोलापूरकरांचा अखेरचा सलाम घेणार आहे मात्र या ब्रिजच्या अनेक आठवणी कायम स्मरणात राहतील हे नक्की..

