सोने,दागिने पैसे चोरीला गेल्याच्या अनेक घटना सर्रास घडत असतात. पुण्यातून मात्र चक्क शेतातील ऊस चोरीला गेल्याची घटना चर्चेचा विषय बनली आहे. हवेली तालुक्यातील आष्टीपूर येथे शेतातून ४० टन ऊस चोरून नेण्यात आला. तक्रारदार अनिल नंदकुमार कामठे यांच्या कुटुंबाची आष्टीपूर येथे शेती आहे. कामठे कुटुंबीय १९ ते २३ ऑगस्टदरम्यान मुंढवा येथे गेले होते. याच काळात त्यांच्या शेतातील सात महिन्यांचा वाढलेला ऊस कापून चोरट्यांनी तब्बल ८८ हजार रुपयांचा ऊस लंपास केला या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.








