• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

Yes News Marathi by Yes News Marathi
August 28, 2026
in मुख्य बातमी
0
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
0
SHARES
7
VIEWS

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा

जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले असून, प्रत्येक शाळेत गणवेश वाटपाची प्रत्यक्ष तपासणी करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याची खात्री करावी,
सर्व शाळांना वितरित करण्यात आलेल्या गणवेशाची गुणवत्ता तपासावी. विद्यार्थ्यांना याची केंद्रप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.

तसेच आदर्श शाळा उपक्रमाचा शाळानिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या भौतिक व शैक्षणिक सुविधांची पूर्तता करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक शाळेचे A, B, C आणि D श्रेणीनुसार वर्गीकरण करून D श्रेणीतील शाळांना C, श्रेणीतील शाळांना B आणि B श्रेणीतील शाळांना A श्रेणीत आणण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

“प्रत्येक शाळेची गुणवत्ता सातत्याने उंचावत नेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा A श्रेणीत आणणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट असावे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
PM SHRI शाळांना नियमित भेटी देऊन शाळांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सर्व केंद्रप्रमुख व संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेला दिल्या.
जिल्ह्यात PM SHRI योजनेंतर्गत 39 शाळा कार्यान्वित असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.
तसेच UDISE Plus पोर्टलवरील माहितीची अचूकता व अद्ययावत नोंदी, तसेच ‘आदर्श शाळा’ उपक्रमाची शाळानिहाय प्रगती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध उपक्रमांच्या आधारे प्रत्येक शाळेची प्रगती तपासून शाळांचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत असलेला इंग्रजी शिक्षणाचा पायलट प्रोजेक्ट महत्त्वपूर्ण असून, त्याच्या परिणामांचा आढावा घेऊन हा उपक्रम पुढील टप्प्यात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचे आकलन, संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पायलट प्रोजेक्टमधून मिळणारे अनुभव, परिणाम आणि चांगल्या पद्धती इतर तालुक्यांमध्येही प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर आढावा बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Previous Post

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

Next Post

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026