सोलापूर शहरातील दमानी नगर येथे असलेला 103 वर्ष जुना रेल्वे ब्रिज वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे शहरातील 54 मीटर असतात चांगलाच चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक- अवंती नगर- जानकर नगर – सीएनएस हॉस्पिटल सलगर वस्ती ते सोरेगाव असा हा 54 मीटर रुंदीचा बाह्य वळण रस्ता आहे. वास्तविक पाहता शहर विकास आराखड्यामध्ये या रस्त्याची रुंदी 54 मीटर ठेवण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात 21 मीटरच जागेवर रस्ता करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते आवंती नगर पर्यंत 25 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ता करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षापूर्वी सोलापूर महापालिकेने 20 कोटी रुपये भरल्यानंतर रेल्वेने अवंतीनग येथे रेल्वे अंडर ब्रिज बांधला. आता महापालिकेकडून रेल्वे अंडर ब्रिजच्या खाली दोन्ही बाजूनी जिल्हा नियोजन समिती मधून मिळालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून एप्रोच रोड केले आहेत. धुम्मा यांची जागा अजूनही पूर्णपणे ताब्यात न मिळाल्यामुळे महापालिकेने रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे एकेरीच रस्ता केला आहे. तसेच पाटील नगर या ठिकाणी आठ महिन्यापूर्वी 17 झोपड्या हटवून त्या ठिकाणी देखील दीड कोटी रुपये खर्च करून 200 मीटर रस्ता केला आहे. त्यामुळे आता आपल्याला सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंती नगर मार्गे मंगळवेढा रोड या ठिकाणी असलेल्या सीएनएस हॉस्पिटल पर्यंत तीन किलोमीटर ये – जा करणे सोपे झाले आहे. दमानी नगर येथील रेल्वे ब्रिज पाडकांबाबत रेल्वे कडून गेल्या दोन वर्षापासून महापालिकेला वारंवार पत्र व्यवहार केला जात होता मात्र महापालिकेने पर्यायी रस्ता शिवाय हा 54 मीटर रस्ता याकडे गांभीर्याने पाहिले नाही त्यामुळे गेल्या दहा दिवसापासून अत्यंत गडबडीने हे काम उरकण्यात आले. त्यामुळे आता हा जो 54 मीटर नवीन रस्ता आज पासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे त्या रस्त्यावर दुभाजक करणे.. फुटपाथ बांधणे.. पथदिवे लावणे दिशादर्शक फलक लावणे ही कामे महापालिकेला करावी लागणार आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षात या 54 मीटर रस्त्याच्या माध्यमातून महापालिकेला प्रथमच एक नवीन बाह्य वळण रस्ता मिळाला आहे तो रस्ता सीएनएच हॉस्पिटल पासून पुढे सोरेगाव पर्यंत झाला तर अख्या शहरवासीयांना या रिंग रोड चा फायदा होणार आहे. आजवर महापालिकेने या रस्त्यावर उतरून सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले आहेत.





