• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

33 पैकी 4 साखर कारखाने बंद; 12 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलाच नाही.

by Yes News Marathi
December 8, 2025
in इतर घडामोडी
0
33 पैकी 4 साखर कारखाने बंद; 12 कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलाच नाही.
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यातील 33 पैकी चार कारखाने बंद असून फक्त 17 साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केला आहे; तर अद्यापही 12 साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न करताच गाळप सुरू केला आहे.

यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना अक्कलकोट, संतनाथ साखर कारखाना वैराग, मकाई साखर कारखाना करमाळा, तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखाना असे चार साखर कारखाने बंदच राहणार आहेत.उपळाई येथील इंद्रेश्वर शुगर फॅक्टरी व अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर फॅक्टरी हे दोन साखर कारखाने इतर ग्रुप कडे वर्ग करण्यात येत आहेत, त्यामुळे हे साखर कारखाने उशिराने सुरू होणार असल्याचे कळते.

उर्वरित 33 साखर कारखान्यांपैकी केवळ 17 साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे.2800 ते 3001 रुपये दर या साखर कारखान्यांनी जाहीर केला आहे. शेतकरी संघटनांचा वाढीव दर जाहीर करण्यासाठी वाढत असलेल्या दबाव व जिल्हाधिकाऱ्यांनी ऊसदर जाहीर करण्यासाठी साखर कारखानदारांना दिलेला वेळ लक्षात घेता जिल्ह्यातील गाळप सुरू केलेल्या सर्वच कारखान्यांनी ऊसदर जाहीर करणे अपेक्षित होते.मात्र हंगाम उलटून दीड महिने लोटले तरीही या कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला नाही. शिवाय पहिल्या पंधरा दिवसाचे ऊस बिलही काढले नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Previous Post

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आग रुग्ण सुरक्षित; मशिनरी जळाल्या…

Next Post

निमाच्या “युनिटी NPL 20 ” क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…!

Next Post
निमाच्या “युनिटी NPL 20 ” क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…!

निमाच्या "युनिटी NPL 20 " क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In