सोलापूर - नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात " निमा" या डॉक्टरांच्या संघटने तर्फे रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी क्रिकेटसह इतर खेळांचा समावेश असलेल्या "युनिटी NPL20" या क्रीडा महोत्सवास जय जवान जय किसान शाळा, विजयपूर रोड येथे सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे युनिटी हॉस्पिटल चे चेअरमन डॉ.चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते व रवी चव्हाण तसेच निमाचे माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ.विनायक टेंभुर्णीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. ही माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर उत्कर्ष वैद्य यांनी दिली.
निमा या डॉक्टरांच्या संघटने कडून दरवर्षी "एनपीएल" या स्पर्धेचे आयोजन हिवाळ्यात केले जाते. अविरतपणे रुग्णसेवेत कार्यरत असणाऱ्या व रुग्णांचे आरोग्य सांभाळणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या फिटनेस साठी ही स्पर्धा म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली असते. त्यामुळे शहरातील समस्त डॉक्टर मंडळींना स्पर्धेचे आकर्षण असते. यंदाचे स्पर्धेचे २० वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या उत्साहाने शहरातील सर्व पॅथींचे डॉक्टर यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुख्य प्रायोजक युनिटी हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बिराजदार व सर्व संचालक डॉक्टर तसेच वेगवेगळ्या टीमचे ओनर असलेले सोलापुरातील नामवंत डॉक्टर्स – डॉ. कांबळे , डॉ.भोगे ,डॉ. भुतडा ,डॉ. पिलगुलवार , डॉ. शेवाळे, टेस्ला डायग्नोस्टिक, डॉ.अहिरसंग, डॉ. कोठे, डॉ. राठोड, डॉ. पैके, डॉ.चव्हाण, डॉ. बंग, डॉ. मोरे , डॉ. पेंडॉर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NPL 20 चे अध्यक्ष डॉ.किरण देशमुख, सचिव डॉ. रोहित शेळवणे कोषाध्यक्ष डॉ.योगेश उडगीकर , यांच्यासह डॉ. धप्पाधुळे, डॉ.माशाळकर, डॉ. स्वामी, डॉ.साहेबराव गायकवाड, डॉ.बियाणी डॉ.बगले डॉ.गाजुल, डॉ. सिंदगी डॉ. अश्विनी देगावकर हे परिश्रम घेत आहेत . कार्यक्रमासाठी निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी , सचिव डॉ. अभिजीत पुजारी, कोषाध्यक्ष डॉ .प्रवीण ननवरे , स्टुडन्ट फोरमचे डॉ. समर्थ वाले व रोहन चौगुले आणि वूमन फोरम अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे यांच्यासह डॉ. रवि गायकवाड, डॉ. पांढरे, डॉ. तात्यासाहेब देशमुख, डॉ. धीमधीमे, डॉ. राजश्री मठ आदि निमा पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर NPL चे प्रणेते डॉ. नितीन बलदवा यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन डॉ. किरण देशमुख यांनी मानले.


