• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 25, 2025
in इतर घडामोडी
0
टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन
0
SHARES
1
VIEWS

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती कक्षाकडून अतिशय काटेकोरपणे करण्यात आले असून ‘‘टीईटी’ चा पेपर ३ लाखांत! शिक्षकांची टोळीच जेरबंद’ या आशयाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या 24 नोव्हेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने परिषदेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत गोपनीयरित्या प्रश्नसंच तयार करून तज्ञांमार्फत स्वतंत्र पाकिटात सीलबंद केले जातात. तयार केलेल्या संचांपैकी यादृच्छिकपणे प्रश्नसंच निवडून गोपनीय मुद्रणालयाकडे दिला जातो. गोपनीय मुद्रणालयामार्फत प्रश्नपत्रिका छापून वर्गखोलीनुसार पाकिटे तयार करून केंद्रनिहाय बॉक्समध्ये सिलबंद पॅकिंग केले जाते. सदर बॉक्सेस सिलबंद गाड्यांमार्फत जिल्हा कस्टडीमध्ये पाठविले जातात. जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची कस्टडी ही शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालय असते अथवा सी.सी.टी.व्ही. व हत्यारबंद पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी असते. गोपनीय मुद्रणालयाकडून आलेल्या प्रश्नपत्रिकांचे बॉक्स हे सिलबंद गाडीतून आले असल्याची व बॉक्सेस व्यवस्थित सिलबंद असल्याची खातरजमा करूनच जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी याच्या उपस्थितीत, कस्टडीमध्ये सदर साहित्य घेतले जाते.

परीक्षेच्या दिवशी जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ रेकॉर्डिंग करूनच झोनल ऑफिसरकडे केंद्रनिहाय प्रश्न पत्रिकांचे बॉक्स दिले जातात. झोनल ऑफिसर कस्टडी ते केंद्रावर सदर बॉक्सेस पोहोच करतांना या प्रवासाचेही चित्रिकरण केले जाते. केंद्रावर सदर बॉक्सेस मधून प्रश्नपत्रिकांची ब्लॉक निहाय पाकिटे काढून, ब्लॉकमध्ये सिलबंद पाकिटे वाटली जातात. उमेदवारांच्या, परीक्षार्थीच्या समोर सदर पाकिटे उघडली जातात. याच पद्धतीने या परीक्षेच्यावेळीही कार्यवाही झालेली आहे.

राज्यभरातून कोणत्याही ठिकाणाहून प्रश्नपत्रिकांची गाडी सिलबंद नसल्याबाबत अथवा गोपनीय प्रश्नपत्रिकांचे बॉक्सेस अथवा पाकिटे सिलबंद नसल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. अथवा असे निदर्शनास आले नाही. म्हणजेच गोपनीय मुद्रणालय ते परीक्षा केंद्र हा प्रश्नपत्रिकांचा प्रवास अत्यंत काटेकोरपणे झालेला दिसून येत आहे. या कोल्हापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज उपरोक्त नमूद कार्यपद्धतीनुसार झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असेही श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

Next Post

54 मीटर रस्त्याची महापालिका आयुक्त ओंबासे यांनी केली पाहणी

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
54 मीटर रस्त्याची महापालिका आयुक्त ओंबासे यांनी केली पाहणी

54 मीटर रस्त्याची महापालिका आयुक्त ओंबासे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026