स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आज पासून रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आज पासून भरले जाणार आहेत. उद्या बहुतांश महापालिकेमध्ये आरक्षण प्रभाग आरक्षण सोडती काढल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि अनगर या नगरपंचायतीची निवडणूक चांगलीच गाजणार आहे. नगराध्यक्ष होण्यासाठी आपापल्या नेतेमंडळींनी घराणेशाहीची परंपरा पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. गट तट.. विकास आघाडी. स्थापन होऊ लागल्या आहेत. लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार असल्यामुळे राजकीय बैठका तसेच पक्षप्रवेशांचे सोहळे जोमाने होऊ लागले आहेत. आज सोलापूरच्या काँग्रेस कमिटी मध्ये नगरपालिका निवडणूक साठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यामुळे आज पासून खऱ्या अर्थाने निवडणुकीचा शहर जिल्ह्यात सुरू होणारा आखाडा पाहायला मिळणार आहे

