• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिटू च्यावतीने टेरीफ कराच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा दहन करताना कार्यकर्ते व पोलिसांची तारांबळ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 13, 2025
in इतर घडामोडी
0
सिटू च्यावतीने टेरीफ कराच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा दहन करताना कार्यकर्ते व पोलिसांची तारांबळ
0
SHARES
1
VIEWS

भारताच्या सार्वभौमत्व व व्यापारी धोरणावर आक्रमण करणाऱ्या अमेरिकन साम्राज्यवादाचा धिक्कार असो – कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

सोलापूर – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत. व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत.
रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. अन्यथा, २७ ऑगस्टपासून आणखी २५ टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून, भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरणांवर सरळ आक्रमण केले जात आहे. तसेच या टेरिफ करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर व टॉवेल्स निर्यातीस बंदी असल्याने अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. टेरीफ कर हाणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.

बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे टेरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन व अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली.

सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी भूमिका मांडताना म्हणाले कि, भारत सरकारने अशा कारस्थानांना बळी पडू नये. नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन व युनायटेड किंगडमसोबतच्या ‘सीईटीए’सारख्या करारांमध्ये झालेल्या तडजोडीमुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रावर संकट अधिक गडद झाले आहे. यामुळे ब्रिटन, युरोपियन युनियनसह साम्राज्यवादी देशांना फायदा होत असून, भारतीय शेतकरी व कामगार यांचे नुकसान होत आहे.
अशा पार्श्वभूमीवर, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये अमेरिकन अटींना मोदी सरकार बळी पडू नये. सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली दहा वर्षांचा संरक्षण करार करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा, अशीही भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी कॉ. नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, ॲड अनिल वासम, दत्ता चव्हाण, शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, दाउद शेख, विल्यम ससाणे, लिंगव्वा सोलापूर, नरेश दुगाणे, शंकुतला पाणीभाते, दीपक निकंबे, बापू साबळे, हसन शेख,मल्लेशम कारमपुरी, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ, रफिक काझी, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अकिल शेख आदींसह लढाऊ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous Post

सोलापुरात होणार वनभाजी महोत्सव…

Next Post

सिनिअर नेशनल मध्ये सुध्दा श्रावणी सूर्यवंशी ने महाराष्ट्र साठी पटकवले पहिले गोल्ड मेडल

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post

सिनिअर नेशनल मध्ये सुध्दा श्रावणी सूर्यवंशी ने महाराष्ट्र साठी पटकवले पहिले गोल्ड मेडल

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026