• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 21, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोमवारी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईचे सुप्रसिद्ध शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरी आणि पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. चंदनशिवे यांनी शाहिरी आणि पोवाडे पहाडी आवाजात गाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची आठवण करून दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अध्यासन केंद्राचे उद्घाटन तसेच मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे विभागप्रमुख, शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरी व पोवाडे प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, केंद्राचे समन्वयक डॉ. अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी केले. डॉ. परमेश्वर हटकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

यावेळी शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे, अजय देहाडे, शिवाजी वाघमारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे गुणगान व गौरव करणारे शाहिरी, पोवाडे सादर करत उपस्थित रसिक, श्रोत्यांना भारावून सोडले. यात ‘सर्वांना वेड लावी अशी देखणी.. मनात माझ्या अण्णाभाऊंची लेखणी’, भीमाईच बाळ.., ‘जगबदल… सांगूनी गेले मला भीमराव..’, जय जय होळकरशाहीचा…. अशा एका पेक्षा एक शाहिरी, पोवाड्यामधून स्वरांचा कडकडाट होताच प्रेक्षकांच्या अंगावर वैचारिकतेचे आणि स्फुर्तीचे शहारे उभे राहिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावरीलही शाहिरी, पोवाडे सादर करून कलाकारांनी श्रोत्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. गौतम कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईचे सुप्रसिद्ध शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरी आणि पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे व अन्य.

Previous Post

सोलापूर महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आयुक्तांनी केला गौरव…

Next Post

शासन निर्णयानुसार बंदीवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींच्या मानधनात वाढ…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
शासन निर्णयानुसार बंदीवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींच्या मानधनात वाढ…

शासन निर्णयानुसार बंदीवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींच्या मानधनात वाढ...

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026