• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

by Yes News Marathi
July 9, 2025
in इतर घडामोडी
0
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मंगळवारी स्वामिनी प्रस्तुत ‘रजनी गंधा’ सादरकर्ते- संदीप पाटील व सहकारी पुणे ह्या कार्यक्रमाने ९ वे पुष्प संपन्न झाले. या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. भक्तीगीते-भावगीते, चित्रपटगीते अशा एक ना अनेक मराठी व हिंदी गानी ख्यातनाम गायक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘रजनी गंधा’ मध्ये सादर केले. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली. सोलापूर चे ख्यातनाम गायक महंमद आयाज यांनी देखील सदर कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह रजपूत, जेष्ठ पत्रकार राकेश टोळ्ळे, संजीवकुमार, झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर, आदिय कुमार सिंग, किरण कुमार, अॅड. विजय हर्डीकर, विधीज्ञ, अक्कलकोट, उद्योगपती राजकुमार सुरवसे, सागर सोनटक्के सोलापूर, सचिन चव्हाण कोल्हापूर, शैलेश पिसे, जयंत सुभेदार अक्कलकोट, दीपक खैराटकर, डॉ. संतोष मेहता, राजेंद्र मायनाळ अध्यक्ष बसव सेंटर, सतीश भूमकर पुणे, विश्वास कुलकर्णी सोलापूर, बाबुशा महिंद्रकर अक्कलकोट, श्रीमती शिला इंगळे मुंबई, श्रीमती छाया मोदगी-कुलकर्णी नाशिक, श्रीमती नंदिनी पाटील दामनगांव, श्रीमती शकुंतला भोसले सोलापूर, श्रीमती चारुशीला भोसले मुरुड, इस्रो चे शास्त्रज्ञ सचिन खमितकर, राज राठोड सोलापूर, किरण पाटील, स्थापत्य अभियंता, तम्मामामा शेळके सामाजिक कार्यकर्ते, अभिनंदन गांधी, व्यावसायिक, अक्कलकोट, अकिल बागवान, सिद्धेश्वर मोरे, उद्योजक, वळसंग, श्रीमती सरोज मशीलकर, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – संदीप पाटील सह पत्नीक, ख्यातनाम गायक महंमद आयाज व सहकारी यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. उद्योजक बसवराज तथा पिंटू दोडमनी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

चौकट :
गुणीजन गौरव : नागेंद्र पंचय्या हिरेमठ,(रुग्णवाहिका चालक) वैद्यकीय सेवा, रामलिंग स्वामी, ( आरोग्य निरीक्षक, हसापुर) वैद्यकीय सेवा, कांतीलाल कल्याणराव जाधव, पोस्टल असिस्टंट, पोस्ट ऑफिस, अक्कलकोट, पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी इंद्रजीत बाभळसुरे दक्षिण पोलीस ठाणे, अक्कलकोट यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

शुक्रवार दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत, ‘ सूर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत हा कार्यक्रम सादर होणार आहे.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अनुयाताई फुगे-पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, रोहिणी देशपांडे, धनश्री पाटील, दिव्या मोरे, कल्पना मोरे, अक्षता मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- भाऊ कापसे, संदीप फुगे-पाटील, लक्ष्मण पाटील, रामचंद्रराव घाटगे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, मनोज निकम, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अश्पाक काझी, सर्फराज शेख, प्रवीण देशमुख, स्वामिनाथ गुरव, ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, राजु नवले, शितल जाधव, अनिकेत सोनटक्के, बालाजी पाटील, निखील पाटील, रोहन शिर्के, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, उमेश येळसंगी, आकाश शिंदे, यश विभूते, विराज माणिकशेट्टी, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार,रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, आकाश सूर्यवंशी, शुभम सावंत, सुनील कटारे, श्रीशैल रोडगे, चन्नप्पा मडीखांबे, प्रमोद पाटील, सुभाष गडसिंग, महेश दणके, समर्थ यादव, प्रा. मोदी, अतुल जाधव, लक्ष्मण विभूते, प्रीतेश किलजे, समर्थ घाडगे, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रा. मनोज जगताप, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रशांत साठे, स्वामिनाथ बाबर, गोविंदराव शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, राहुल इंडे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल व मंडप सजावट कल्लप्पा छकडे यांनी केले.

Previous Post

सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ सिमेंट वाहतूक बलकर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू

Next Post

सोलापुरात स्टटमॅन रोटरी बर्ड सेंटरचे शुक्रवारी उदघाटन

Next Post
सोलापुरात स्टटमॅन रोटरी बर्ड सेंटरचे शुक्रवारी उदघाटन

सोलापुरात स्टटमॅन रोटरी बर्ड सेंटरचे शुक्रवारी उदघाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group