• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाली भाषेत ज्ञानाचा व संशोधनाचा मोठा भांडार: कुलगुरू डॉ. महानवर…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2025
in इतर घडामोडी
0
पाली भाषेत ज्ञानाचा व संशोधनाचा मोठा भांडार: कुलगुरू डॉ. महानवर…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठातर्फे पाली भाषा परिसंवाद संपन्न!

सोलापूर, दि. 2- पाली, संस्कृत भाषेमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व ज्ञानाचा मोठा भांडार आहे. या भाषा विद्यार्थी, अभ्यासक व संशोधकांनी अवगत करून प्राचीन ज्ञानाचा वापर करावा आणि प्रगती साधावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

सोमवारी, सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि पाली भाषा विभागाच्यावतीने आयोजित पाली भाषा परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जयसिंगपूरचे भदंत काश्यपायन महाथेरो, अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत सांगलीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा भाषा संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, सिद्धार्थ कॉलेज मुंबईचे डॉ. विजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. विजयकुमार झुंबरे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. उत्तम कांबळे यांनी करून दिला.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, पाली, संस्कृत, मोडी लिपी या प्राचीन भाषा आहेत. या भाषांमध्ये खूप काही ज्ञानाचे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे आजच्या पिढीने या भाषा शिकून घ्यावे. विद्यापीठात या भाषांचे अभ्यासक्रम आहे. या प्राचीन भाषांमध्ये संशोधनास मोठा वाव आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. विद्यापीठाकडून विविध उपक्रम सुरू आहेत. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मोठे पाऊल विद्यापीठाने उचलले आहे. पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प विद्यापीठाने केलेला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

चंद्रकांत सांगलीकर यांनी पाली भाषेच्या संवर्धनासाठी सर्व स्तरातून प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना पाली भाषेचे शिक्षण देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राजाभाऊ सरवदे यांनी 2600 वर्षांपूर्वीची परंपरा पाली भाषेला लाभली आहे. प्राचीन इतिहास, संस्कृती ज्ञानाचा ठेवा या भाषेमध्ये आहे. विद्यापीठात पालीभाषा सुरू करण्यामागची पार्श्वभूमी त्यांना यावेळी सांगितली. येत्या काळात पीएच.डी. करण्याची संधी देखील विद्यापीठात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. गौतम कांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची माहिती दिली. पाली भाषा विभागाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

या प्रसंगी सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि पाली भाषा विभागाच्यावतीने आयोजित पाली भाषा परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, जयसिंगपूरचे भदंत काश्यपायन महाथेरो, अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत सांगलीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा भाषा संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे व अन्य.

Previous Post

NTPC कडून सोलापुरातील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयासाठी 2.79 कोटींचा निधी प्रदान…

Next Post

जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित साइकल रॅलीचे आयोजन…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित साइकल रॅलीचे आयोजन…

जागतिक पर्यावरण आणि सायकल दिनानिमित साइकल रॅलीचे आयोजन...

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026