• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाकणी येथील वनविभागाच्या जागेतील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग अखेर मोकळा…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 6, 2025
in इतर घडामोडी
0
पाकणी येथील वनविभागाच्या जागेतील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग अखेर मोकळा…
0
SHARES
1
VIEWS

आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिळवून दिली मान्यता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे वाचणार ८ कोटी रुपये

सोलापूर – सोलापूरकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नातील महत्त्वाचा घटक असलेल्या पाकणी येथील प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा मार्ग मंगळवारी झालेल्या शासन निर्णयामुळे अखेर मोकळा झाला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या शासन निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेचे आठ कोटी रुपये वाचणार आहेत. या निर्णयाकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.

सोलापूर शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीतून जलवाहिनीद्वारे आलेले पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी येथे ६६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे. या जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतर करण्याचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. या प्रश्नी आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेऊन ३० जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवला. सोलापूर महानगरपालिकेने जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा हस्तांतरित न करून घेताच निविदा काढल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार आमदार देवेंद्र कोठे यांनी चव्हाट्यावर आणला. तसेच पाकणी येथील वनविभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आणि नियमित पाठपुरावा केला होता. यावर सोलापूरची पाणी समस्या सोडवण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले होते. अखेर मंगळवारी शासनाने वनविभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना सोलापूर जिल्ह्यातील नव्याने प्रस्तावित नगर – सोलापूर – अक्कलकोट – महाराष्ट्र कर्नाटक सीमा हद्द ग्रीनफिल्ड अलाइनमेंट राष्ट्रीय महामार्गात बाधित होत असलेल्या ५ हेक्टर २३ आर व सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्याकरिता उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी पाकणी जलशुद्धीकरण केंद्र येथील अस्तित्वात असलेले ८० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र आणि प्रस्तावित असलेले ६६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी बाधित होत असलेल्या ६ हेक्टर वन जमिनीच्या मोबदल्यात आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील एकूण ११ हेक्टर २३ आर गायरान जमीन ग्रीनफील्ड अलाइनमेंट राष्ट्रीय महामार्गात बाधित होत असलेल्या ५ हेक्टर २३ आर वनीकरण संदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून एनपीव्हि वसूल करून व चालू वर्षाच्या बाजारभावानुसार येणारे मूल्यांकन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून वसूल करून शासनाची पूर्व मान्यता देण्यात आली आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रकरिता बाधित होत असलेल्या ६ हेक्टर वनीकरणाबाबत सोलापूर महानगरपालिकेकडून एनपीव्ही वसूल करून आणि पाणीपुरवठा हे सार्वजनिक प्रयोजन असल्यामुळे महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किमतीने वनसंरक्षक (वनविभाग सोलापूर) यांना कब्जे हक्काने प्रदान करण्यास शासनाने मंगळवारी मंजुरी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

महापालिकेचे वाचणार ८ कोटी रुपये

सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता वनविभागाच्या जागेचा मोबदला म्हणून ८ कोटी रुपये देणे महापालिकेला शक्य नाही. यावर उपाय म्हणून ही जागा महापालिकेकडून एनपीव्ही वसूल करून महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किमतीने कब्जे हक्काने देण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे ८ कोटी रुपये वाचण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घेतला.

Previous Post

अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले अनेक निर्णय

Next Post

सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

Related Posts

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
Next Post
सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे…

सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे...

ताज्या बातम्या

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026