भवानी पेठ सोलापूर येथील बिल्डर्स डेव्हलपर्स व काँट्रॅक्टर श्री अनिरुद्ध होमकर यांच्या www.homkarrealties.in होमकर रियॅल्टिज या फर्मच्या वेबसाईट चे अनावरण, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर चे सह-अध्यक्ष, श्री नाथ संस्थान औसा चे, सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते रामनवमीच्या शुभमुहूर्तावर होमकर रियॅल्टिज च्या भवानीपेठ, नामदेव नगर येथील ऑफिस मध्ये, संपन्न झाले.
फर्मच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या तसेच आतापर्यंत होमकर यांच्या तर्फे करण्यात आलेल्या सर्व प्रोजेक्ट ची माहिती व फोटोज वेबसाईट वर दिलेले आहेत, जेणेकरून कंपनी विषयक संपूर्ण माहिती वन क्लिक वर ग्राहकांपर्यंत तसेच ज्यांना आमच्या कंपनी सोबत काम करण्याची इच्छा आहे व कामांविषयी माहिती हवी आहे अश्या सर्व लोकांपर्यंत सहजरीत्या पोहोचणे शक्य होण्यासाठी या वेबसाईट ची निर्मिती केली असल्याचे संचालक अनिरुद्ध होमकर यांनी सांगितले.
यावेळी श्वेतांबरी अनिरुद्ध होमकर, अनिकेत जवंजळ, भास्कर वैजवाडे, श्री लिंगप्पा, सागर कुरपाटी आदी उपस्थित होते.