सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाची सोलापूर शहर अध्यक्षपदी सचिन चव्हाण यांची निवड झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसात आठ हजार सभासद नोंदणी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाण यांचे कामाची पध्दतीवर खुश असून पाठ थोपटून शब्दाशकी दिली. सचिन चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची विधान भवनात भेट घेवून सोलापूर शहराचा आढावा सांगितले. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरात पाचशे शिवसेना शिंदे गट शाखा उघडणार असून जवळ जवळ एक लाखापेक्षा कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करणार आहे आणि शिवसेना शिंदे गटाची विचार प्रत्येक घराघरात वार्डा वार्डात पोहाचविणार आहे चव्हाण हे शहर अध्यक्षपदी निवड झाल्यापासून तीन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यामुळे सोलापूर शहरात एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून
ओळख निर्माण केली. आगामी होणाऱ्या सोलापूर महानगर पालिका निवडणूकीसाठी सचिन चव्हाण यांनी मोर्चे बांधणीला सुरू केली आहे. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्तेसाठी चोवीस तास वेळ देणार असून महानगर पालिकेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे.