• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मुख्यमंत्री यांचा 100 दिवसीय कृती आराखडा…

by Yes News Marathi
March 22, 2025
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्री यांचा 100 दिवसीय कृती आराखडा…
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला पाहिजे
– विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

*100 दिवशीय कृती आराखडा कार्यक्रमात प्रत्येक शासकीय कार्यालयाने सहभाग नोंदवणे बंधनकारक, या अंतर्गत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला पाहिजे

*जिल्हाधिकारी कार्यालयाचा सनद वाटप कार्यक्रम कौतुकास्पद

*जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही त्वरित बसवून घ्यावेत

*सोलापूर जिल्ह्यात गुंतवणूक व उद्योग वाढीसाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे

सोलापूर, दिनांक 21(जिमाका):- मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र 100 दिवसीय कृती आराखड्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत काम सुरू आहे. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन व्हावा तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.


नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्री पुलकुंडवार मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी महसूल तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.


विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले की या शंभर दिवशी कृती आराखडा कार्यक्रमात जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयानी सक्रिय सहभाग घेणे बंधनकारक आहे जरी अद्याप पर्यंत याच सहभागी झालेले नाहीत अशा कार्यालयाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून आराखड्यातील सात सुत्री कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सोलापूर जिल्हा प्रशासन या अंतर्गत चांगले काम करत असून या अंतर्गत राज्यस्तरावर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.


या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा पोट खराबा जमीन तसेच बिगर शेती असलेल्या जमिनीसाठी सनद वाटप कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळा व लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगून अभिलेखासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून त्या अनुषंगाने अभिलेखाचे निंदनीकरण व सुसूत्रीकरण केले जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा परिषद तसेच महापालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून घेण्याची कार्यवाही त्वरित पार पाडावी. यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच सीएसआर फंडातून उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.


सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तसेच कार्यालय परिसर कार्यालयातील स्वच्छता घरे तसेच अभ्यागतासाठी असलेली स्वच्छतागृहे कायम स्वरुपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखाची असेल जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी. आपण केलेल्या कामकाजाचे श्रेष्ठ संस्थेकडून तपासणीचे काम लवकरच सुरू होणार आहे तरी यात आपला जिल्हा चांगले कामकाज करेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सुचित केले.
तसेच जिल्ह्यात गुंतवणूक झाल्यानंतर उद्योग वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्या अनुषंगाने गुंतवणूक तसेच पायाभूत प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याचे वातावरण उद्योग स्नेही असले पाहिजे. या अंतर्गत कोणीही अडचण करत असेल तर संबंधितावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवले जात असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सुचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन 100 दिवशी कृती आराखड्या अंतर्गत करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच नाविन्यपूर्ण कामकाजाची ही माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.


प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी प्रांत स्तरावर प्रांताधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

Previous Post

आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार…

Next Post

रमजान हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. त्यातून एकता आणि बंधुत्वाचा संदेश मिळतो – अजित पवार

Next Post
रमजान हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. त्यातून एकता आणि बंधुत्वाचा संदेश मिळतो – अजित पवार

रमजान हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. त्यातून एकता आणि बंधुत्वाचा संदेश मिळतो - अजित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group