सोलापूर दि, ( ) जागतिक महिला दिन व कै. पार्वतीबाई बाबुरावसा भूमकर यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ८ मार्च २०२५ रोजी सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये बालक मंदिर व प्राथमिक विद्यामंदिरच्या माता पालकांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद माधुरीताई अनिलसा भूमकर यांनी भूषविले .तर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन आहार तज्ञ डॉ .सोनाली हरिष घोंगडे यांच्या हस्ते आकाशात फुगे उडून करण्यात आले.
‘आजच्या धावपळीच्या युगात महिला आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. स्त्री सक्षम असेल तरच संपूर्ण कुटुंब सक्षम व समर्थ राहते म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. कारण स्त्री ही घराचा पाया असते’ असे प्रतिपादन आहार तज्ञ डॉ.सोनाली घोंगडे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरी भुमकर यांनी आपल्या मनोगतात ‘सर्वसामान्य वर्गातील महिलांनी समाजामध्ये बाहेर पडले पाहिजे .सक्षम झाले पाहिजे व स्वतःला सिद्ध केले पाहिजे या दृष्टिकोनातून या महिलांसाठी सन २०१५ सालापासून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
या स्पर्धेचे ९वे वर्ष आहे .या स्पर्धेत शाळेतील दोनशे माता पालकांनी सहभाग नोंदवला होता .घागर बॅलेन्स,फुगा हाताने मारत रेषेच्या बाहेर येणे,ग्लासचा मनोरा बनविणे,संगीत खुर्ची असे वेगवेगळे खेळ घेऊन दहा महिलांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले व अंताक्षरी, शब्दावरून उखाणा,जनरल नॉलेज प्रश्न ग्लासचा मनोरा पाडणे अशा खेळातून प्रथम पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली .या बक्षिसांसाठी प्रथम क्रमांकाच्या साडीचे प्रयोजक म्हणून माधुरीताई भूमकर,द्वितीय क्रमांकासाठी सुनंदा बारड,तृतीय क्रमांकासाठी गायत्री कोल्हापुरे,चौथ्या क्रमांकासाठी सारिका बिद्री व पाचव्या क्रमांकासाठी विद्या गोयल यांनी प्रायोजकत्व केले होते.शेवटच्या पाच साड्यांचे प्रायोजक राजश्री बंकापुर या होत्या.प्रथम क्रमांक मिळवलेल्या जयश्री दत्तात्रय पुप्पल यांना माधुरी भूमकर यांच्याकडून १५००१ रू ची पैठणी . साडी,सन्मानचिन्ह,मानाचा मुकुट व त्याचबरोबर होम मिनिस्टर बॅच देऊन गौरविण्यात आले.तर द्वितीय क्रमांकाच्या पूजा गणेश गवळी यांना सुनंदा बारड यांच्यावतीने १०००१ रू ची साडी व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले .तृतीय क्रमांकाच्या राजश्री मायप्पा हांडे यांना सौ . गायत्री कोल्हापुरे त्यांच्याकडून ५००१ रू ची साडी व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .प्रेक्षकांसाठी आकर्षक भेटवस्तूसाठी कांचन मिरजकर यांच्याकडून ४००१ रू च्याआकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या .चौथ्या क्रमांकाच्या सुलभा महादेव निकम यांना .सारिका बिद्री यांच्याकडून ३००१ रू ची साडी व सन्मानचिन्ह देण्यात आले .पाचव्या क्रमांकाच्या शितल सुनिल कुरूडे यांना .विद्या गोयल यांच्याकडून २५०१ रू ची साडी व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .तसेच २००० रू ची एक साडी याप्रमाणे पाच उत्तेजनार्थ साड्या व सन्मान चिन्ह .राजश्री बंकापुर यांच्यातर्फे वर्षाराणी शार्दुल देवरकोंडा, अरुणा विठ्ठल शिंदे, शिल्पा नागेश हौशेट्टी निकत इरफान शेख महानंदा चंद्रशेखर हुळळे या पाच महिलांना देऊन सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमात सर्व माता पालक अतिशय आनंदाने सहभागी झाले होते .दुपारी ५.०० वाजल्यापासून ते रात्री ९.००वाजेपर्यंत सर्व माता पालकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी केले .सूत्रसंचालन .लक्ष्मी बिच्चल यांनी केले. तर आभार रेखा नेलुरे यांनी मानले .याप्रसंगी महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मगजी,युती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता हबीब,सौ. केशरताई भूमकर, वासंती भूमकर, विद्या पवार,रुपाली दामजी,शांताबाई भूमकर,मधु भूमकर,मिताली भूमकर,राणी भूमकर,.लक्ष्मी बारड,सुरेखा झाड,मोनाली रंगरेज इत्यादी महिला उपस्थित होत्या.
विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मा. संजीव बिद्री,शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा.राजूसा भूमकर,संस्थेचे सचि मा.श्री .जयकुमारसा कोल्हापुरे,शैक्षणिक संस्थेचे सचिव मा. श्री .गजाननसा गोयल संजीव रंगरेज,शिरीष कोल्हापूर,भरतकुमार शालगर श्रीराम पवार, अनिल रंगरेज,मुख्याध्यापक उमदीकर व रंगरेज सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .
विजेते 10 स्पर्धक पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक – जयश्री पुप्पल, द्वितीय क्रमांक – पुजा गवळी, तृतीय क्रमांक – राजश्री हांडे, चौथा क्रमांक – सुलभा निकम, पाचवा क्रमांक – शितल कुरुडे, उत्तेजनार्थ अनुक्रमे – वर्षाराणी देवरकोंडा,अरुणा शिंदे,शिल्पा हौशेट्टी, निकत शेख व महानंदा हुल्ले











