सोलापूर : स्वरा संकल्प फाउंडेशनच्या वतीने आधार केअर सेंटर भोगाव येथे वृद्ध रुग्णांना धान्य व शहाळ वाटप करण्यात आले. स्वरा संकल्प संस्थेचे संस्थापक डॉ नंदा शिवगुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून वृद्ध रुग्णांचे काळजी घेणाऱ्या आधार केअर सेंटर भोगाव येथील रुग्णांना पोस्टीक आहारासाठी लागणारे धान्य व शहाळा वाटप करण्यात आले. यावेळी आधार केअर सेंटर चे संस्थापक डॉ नंदा शिवगुंडे स्वरा संकल्प फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष राहुल निमाले उपाध्यक्ष सोमनाथ कोणदे सहसचिव विकास हिरेमठ इतर पदाअधिकारी समावेश संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.