पं.राजा काळे यांचे गायन अमर ओक यांचे बासरीवादनाने जिंकली पंढरपूरकरांची मने
पंढरपूर :-तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे आरती साऊंड सिस्टिम मनमाडकर परिवार आणि नादब्रह्म कला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सांगता श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामध्ये संपन्न झाली. दुसऱ्या दिवशी अमर ओक अभेद अभिषेकी डॉ. भोपटकर डॉ. अनिल जोशी भगवान भाऊ मनमाडकर. शुभांगीताई मनमाडकर.ज्ञानेश्वर दुधाणे.विद्याधर ताठे. यांच्या शुभहस्ते दीप प्रजनन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला पं.अमर ओक यांच्या बासरी वादनाला सुरुवात झाली त्यांनी बासरी मध्ये राग हंसध्वनी रूपक तालामध्ये सादर करत आलाप जोड झाला याने आपल्या बासरी वादनामध्ये अधिक रंगत वाढवत पिलू रागामध्ये एक अतिशय सुंदर अशी ठुमरी सादर करत बाजे रे मुरलिया बाजे आणि माझे माहेर पंढरी या अभंगाने आपल्या बासरी वादनाची सांगता केली त्यांना तितकीच अप्रतिम साथ संगत तबला पांडुरंग पवार आणि पखवाज कृष्णा साळुंखे यांनी केली.

त्यानंतर द्वितीय सत्र मध्ये पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवची नादब्रह्म कला फाउंडेशन यांच्या वतीने तयार करण्यात आलेली स्मरणिका प्रमुख विश्वस्त आळंदी देवस्थान योगी निरंजननाथजी ज्ञानेश्वरकाका वीर पं.राजा काळे.प्रणव परिचारक वसंत मराठे.ज्ञानेश्वर दुधाणे.भगवानभाऊ मनमाडकर.दीपक कलढोणे.यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आली त्यांनतर राजा काळे यांच्या शास्त्रीय गायनाला सुरुवात झाली.

त्यांनी राग मारुबिहाग विलंबित तीनतालात सादर करत अभ्यासपूर्ण गायकी सादर करत पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी.बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.तुझी सेवा करीन मनोभावे.आणि शेवटी सर्वात्मका सर्वैस्वरा भैरवी सादर केली त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला पांडुरंग पवार हार्मोनियम उदय कुलकर्णी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे स्वरसाथ अभेद अभिषेकी आणि जोशी टाळ वैभव केंगार यांनी केली.

महोत्सवाचे सुंदर सुत्रसंचलन संकेत कुलकर्णी आणि आरतीताई मनमाडकर यांनी केले.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे भगवान भाऊ मनमाडकर धनंजय मनमाडकर माऊली खरात वैभव केंगार.सुदर्शन कुंभार.एस पी कुलकर्णी,प्रसाद कुलकर्णी.गौरी अमळनेरकर.माधूरी जोशी.पारूल पारमार.निता कुलकर्णी.स्वानंदी काणे रामेश्वर जाधव यांनी करत महोत्सव यशस्वी केला.










