सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे कुंभमेळाव्यात आज सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसांपूर्वी ते मित्रांसमवेत प्रयागराज ला गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले.
त्यांचा मृतदेह विमानाने सोलापुरात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हा मुलगा, दोन मुली तसेच पत्नी असा परिवार आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होत. या दुःखद घटनेमुळे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शहर उत्तर मतदार संघातून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त होत आहे.