• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सभांना गर्दी होत होती मात्र त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही- राज ठाकरें

Yes News Marathi by Yes News Marathi
November 25, 2024
in इतर घडामोडी
0
सभांना गर्दी होत होती मात्र त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही- राज ठाकरें
0
SHARES
1
VIEWS

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं घडलं आहे की त्यांचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसणार. या पराभवानंतर राज ठाकरेंनी अवघ्या तीन शब्दांचं, ‘अविश्वसनीय, तुर्तास एवढेच…’ अशी पोस्ट केली होती. यानंतर राज ठाकरेंनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबरची जवळीक घातक ठरल्याचं मत पराभूत उमेदवारांनी नोंदवल्याची माहिती समोर येत आहे.

आज राज ठाकरेंनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. या बैठकीमध्ये ईव्हीएमसंदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंकडे केल्या. तसेच भाजपाबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरलेली नाहीये, असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना सांगितलं आहे. राज ठाकरेंनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण 42 उमेदवार उभे केले होते. मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दादर-माहिम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. राज ठाकरेंनी या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावलं होतं. नेमका पराभव झाला तो कशामुळे झाला याची चाचपणी राज ठाकरेंनी या बैठकीमध्ये केली. मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता, सभांना गर्दी होत होती मग त्याचं रुपांतर मतांमध्ये का झालं नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील अशी अपेक्षा मनसेला होती. मात्र 138 उमेदवार उभे करुन एकही उमेदवार निवडून आला नाही. यावेळेस बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीला भाजपाशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला भाजपाशी जवळीक करणं फायद्याचं ठरलेलं नाही असं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंशी बोलताना कळवलं. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी कोणतही मार्गदर्शन केलं नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटतं हे जाणून घेतलं. आता राज ठाकरे यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का हे अजून गुलदस्त्यातच आहे.

Previous Post

संविधान दिनानिमित्त संविधान गौरव परीक्षा उत्साहात संपन्न

Next Post

राज्यघटनेतून ‘समाजवादी’ आणि ‘सेक्युलर’ शब्द हटवले जाणार नाहीत : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Related Posts

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..
इतर घडामोडी

भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे..

October 5, 2026
शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा
इतर घडामोडी

शक्तिपूजा मंडळातर्फे यंदा ‘रावण वध’चा हलता देखावा

October 5, 2026
साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !
इतर घडामोडी

साडेतीन शक्तीपीठ दर्शनासाठी ज्यादा बसेस !

October 5, 2026
आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!
इतर घडामोडी

आयुष्मान भारत योजनेसाठी 507 कोटी रुपयांचा निधी वितरित; उपचार होणार तत्काळ..!

October 5, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
Next Post
राज्यघटनेतून ‘समाजवादी’ आणि ‘सेक्युलर’ शब्द हटवले जाणार नाहीत : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

ताज्या बातम्या

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026