अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ सचिन कल्याणशेट्टी यांनी भोसगे येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत तर काही सुरू आहेत. विकासाची गंगा गावात वाहतच राहावी यासाठी महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी कमळाला मत द्या असे आवाहन सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी केले.
गावात धनगर वस्ती, महार वस्ती आणि मांग वस्ती येथे सिमेंट रस्ते करणे, बिरलिंगेश्वर देवस्थान मंदिरासमोर आणि भोसे तांडा सेवालाल मंदिरासमोर सभामंडप, मलप्पा स्वामी घर ते हनुमान मंदिर दरम्यान सिमेंटचा रस्ता करणे, सिद्दप्पा अर्जुनगी घर ते तोरणी रस्त्यापर्यंत सिमेंटचा रस्ता करणे, अंगणवाडी इमारतीची दुरूस्ती करणे, नाला खोलीकरण व सरळीकरण कऱणे अशी कामे झाली आहेत. याशिवाय जलजीवन मिशनमधून गावात नळाव्दारे पाणी पुरवठा करणे, लक्ष्मी मंदिर ते मल्लाबादे वाडापर्यंत खडीकरण व मुरूमीकरण करणे, आंबेडकरनगर सिमेंटचा रस्ता करणे, मल्लिकार्जुन मंदिरसमोर सभामंडप बांधणे, निंगवळळी रोड ते मैंदर्गी रोडपर्यंत रस्त्याच्या कडेला गटारे कऱणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड नविन वर्ग व इमारत बांधणे, मैंदर्गी ते भोसगा रस्ता सुधारणा करणे अशी कामे मंजूर झाली आहेत.
यावेळी मोतीराम राठोड, परमेश्वर यादवाड, . सिद्धाराम बाके, अविनाश मडीखांबे, लक्ष्मीपुत्र बिराजदार, राजशेखर नागुर, स्वामिनाथ नागुर, श्रीशैल बिराजदार, सिद्धाराम सगर, मल्लिनाथ सगर, हणमंत पाटील, कल्याणी सगर, राम बिराजदार,मल्लेशी पाटील, मल्लिनाथ नडगेरी,. शिवनिंगप्पा कळसगोंड, शिवपुत्र जनगोंड, सुनील राठोड यांच्यासह भाजप आणि महायुती मित्र पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.