• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यात देवेंद्र आणि सोलापूर शहर मध्य मध्ये पण देवेंद्रच पाहिजे : विवेक घळसासी

by Yes News Marathi
November 5, 2024
in मुख्य बातमी
0
राज्यात देवेंद्र आणि सोलापूर शहर मध्य मध्ये पण देवेंद्रच पाहिजे : विवेक घळसासी
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्रभर प्रख्यात ‘अमृतवक्ते’ म्हणून ओळख असलेल्या विवेक घळसासी यांचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि शुभ संकेतांची घटना आहे. अध्यात्मिक प्रवचनातून समाजजागृती करणारे घळसासी सर, अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना दिशा देणारे प्रतिभावान विचारवंत आहेत. भाजपा महायुतीच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभेची अधिकृत उमेदवारी मला जाहीर झालेल्या विजयासाठी त्यांचे आशीर्वाद मिळाले, हे मी माझे भाग्यच समजतो असे प्रतिपादन सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी केले .

विवेक घळसासी यांचा व्याख्यानांच्या निमित्ताने सोलापूर दौरा होता. यावेळी देवेंद्र कोठे यांनी त्यांची भेट घेतली. घळसासी यांनी कोठेंना शुभाशीर्वाद देताना पुढील यशासाठी प्रेरणा दिली. मतदारांना राष्ट्रहितासाठी एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन करत ‘आता राज्यात देवेंद्र पाहिजे, आणि शहर मध्य मध्ये पण देवेंद्रच पाहिजे. त्याकरिता जात, भाषा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीच्या भेदभावाला बळी न पडता राष्ट्रहितासाठी आपण एकत्र आले पाहिजे. असं आवाहन विवेक घळसासी यांनी केले.

देवेंद्र कोठे म्हणाले, सध्या नागपुरात वास्तव्यास असणारे निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे सोलापूरमध्ये असंख्य अनुयायी असून घळसासी सरांनी माझ्याबद्दल काढलेल्या गौरवोद़्गारांमुळे सोलापुरातील तेजस्वी विचारांच्या राष्ट्रभक्त, सुजाण आणि सतर्क नागरिकांच्या मतांचे दान माझ्या पारड्यात पडेल, याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत, आणि येत्या 20 तारखेला मतपेटीतून तो आशीर्वाद व्यक्त होवो, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना!

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार निवडणूक लढविणार-जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव… कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची गेमचेंजर आश्वासनं

Next Post
मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव… कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची गेमचेंजर आश्वासनं

मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव… कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची गेमचेंजर आश्वासनं

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group