• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रामाणिकपणे काम करता आले – जिल्हा सरकारी वकील राजपूत

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2024
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS


प्रकट मुलाखतीमधून उलगडला प्रदीपसिंह राजपूत यांचा जीवन प्रवास
सोलापूर,(प्रतिनिधी):- 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही. धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रमाणिकपणे काम करता आले असं सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी प्रकट मुलाखती मधून आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला. ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हलके फुलके केले.

6 वर्षाच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अ‍ॅड.प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने बुधवार दि. 24 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी प्रशांत बडवे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देत प्रास्ताविक केले. त्यानंतर अ‍ॅड प्रदीपसिंह राजपूत यांच्या जीवनावरील एक चित्रफित आर्यन क्रिएशनच्या वतीने तयार करण्यात आली होती त्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुलाखतकार ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे स्वागत अ‍ॅड प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. नंतर मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेचा, किरण सुतार, मिलिंद फडके, ज्ञानेश्‍वर म्यकल, रंगनाथ बंकापूर, व्यंकटेश कैंची, मदन मोरे, प्रशांत बडवे यांच्या वतीने अ‍ॅड प्रदीपसिंह राजपूत यांचा सप्त्नीक सत्कार केला. नंतर प्रसाद जिरांकलगीकर यांनी वैयक्तीक गीत सादर केले.
कोणत्याही सोई सुविधा नसताना अभ्यासाची ओढ कशी लागली आणि जीवनाचा प्रवास कसा सुरू झाला असा प्रश्‍न विवेक घळसासी यांनी विचारताच प्रदीपसिंह यांनी घरातील परिस्थिती कशी बेताची होती.

त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे कसे ओढला गेलो याबाबतचा प्रवास सांगितला. संघाच्या मुशीत तयार झाल्याने धाडसी वृत्तीची वाढ झाली आणि त्यातूनच जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनाला बळी पडलो नाही. कुटुंबाच्या गरजा मर्यादित असल्याने चैनीच्या वस्तुची आवश्यकता वाटली नाही म्हणूनच प्रामाणिकपणे न्यायदानाच्या सेवेत काम करता आले. कोणताही पक्ष, धर्म न पाहता काम केल्याने चांगले अनुभव आले. असे सांगत त्यांनी काही अनुभवही मुलाखतीमधून सांगितले. मुलाखतकार विवेक घळसासी यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना प्रदीपसिंह राजपूत यांना दिलखुलासपणे उत्तरे दिली त्यामुळे सभागृहात टाळ्यांचा गडगडाट होत होता.

पत्नीसोबत लुनावर बसून सिध्देश्‍वर मंदिरातील प्रवास असो की संघ परिवारासाठी आणि वडीलांसाठी घेतलेली नवी कार तसेच आरोपींना शिक्षे पर्यत पोहोचवल्यानंतर पिडित कुटुंबातील 50 सदस्यांनी येवून आभार व्यक्त केल्याचा प्रसंग असे अनेक किस्से सांगत प्रदीपसिंह राजपूत यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच जीवनाला कलाटणी मिळाली हे सांगून मुलाखतीला विराम दिला. या मुलाखतीच्या शेवटी रसिका कुलकर्णी आणि सारीका कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला दैनिक सुराज्य चे संपादक राकेश टोळे, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, मुंबई गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे, श्रीमती रेखा राजपूत, ओंकारसिंह राजपूत यांच्यासह वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Previous Post

असंघटित कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी तत्पर :- जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार

Next Post

बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांची घोषणा

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
Next Post
बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांची घोषणा

बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांची घोषणा

ताज्या बातम्या

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026