राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह निमित्त असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोजजी व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधकाम विभागाच्या वतीने जय शंकर तालीम सात रस्ता अब्दुलपुरकर मंगल कार्यालय परिसर येथे असंघटित कामगारांसाठी मोफत बांधकाम कामगार कार्ड योजना भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून बांधकाम कामगारांना महायुती सरकारकडून मंजूर केलेल्या विविध योजनांची माहिती पुस्तिका देण्यात आली तसेच असंघटित कामगारांसाठी घेण्यात आलेल्या बांधकाम कामगार कार्ड योजना शिबिराचे प्रातिनिधिक स्वरूपात पाच फॉर्म स्वीकारून शुभारंभ करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात अजित दादा पवार हे राज्यातील जनसामान्यांसाठी महिलांसाठी कष्टकरी वर्गासाठी सातत्याने वेगवेगळ्या योजनाची तरतूद करून त्या प्रत्यक्ष अमलात आणतात.याचा लाभ असंख्य नागरिकांना झाला आहे बांधकाम सेल विभाग अध्यक्ष संजय सांगळे व कार्याध्यक्ष बालराज कमलापूरे यांनी आयोजित केलेल्या केलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. व आयोजित शिबिराचा लाभ कामगारांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून असंघटित कामगारांना लाभ मिळवून देण्या करीता शासन प्रशासन दरबारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्न करेल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी उपस्थित कामगारांना दिली.
याप्रसंगी कुमार जंगडेकर अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजीव मोरे मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड ,सोशल मीडिया शहर – जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे,श्यामराव गांगर्डे
मार्तंड शिंगारे, श्रीनिवास पोतराज ,यलप्पा वर्जन , कृष्णा चन्नेपाग, विठ्ठल ढाले,योगेश चलवादे,उमेश संगेपाग, शांतराज म्हैत्रे,लखन कांबळे आदी उपस्थित होते