राहुल आपटे/विजयपूर : हुंडा बळी कोण आहे हे बघत नाही, त्यामुळेच कोरोना वॉरियर्स परीचारीका याला बळी पडली आहे. हुंडा बळी अजुन जिवंत आहे याचे उदाहरण म्हणजे येथील गणॆश नगर मधील १४ तारखेची घट्ना आहे, येथील सरकारी सिव्हील हॉस्पीटल मधील एक नर्स निखत कौसर (३०) हिचा विवाह रियाज अहमद, बरोबर विवाह झाला होता. आठ महीन्या पुर्वी तिने एका बालकाला जन्म दिला होता. लग्न झाल्यापासून पती, सासू, ननंद यानी तिला जाच देण्यास सुरुवात केली होती. माहेरून पैसे घेउन ये, कार चि पण मागणी करत होते. माहेरचे एवढे पैसे देण्यास असमर्थ होते. लग्ना बोळणी झाल्याप्रमाणे हुंडा दिला होता. पण त्यांची मागणी वाढतच होती.
१४ मे रोजी असेच दरदरोज प्रमाणे मागणी केली तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. चिडून जाउन पती रियाज अहमद यानी, व त्याची आई बानूबी, दिर निसार अहमद, ननंद नहेदा यानी निखत कौसर हिचे हात पाय पकडून तिला जबरदस्तीने ऎच.सि.एल हायड्रोक्सी क्लोरोफीन गोळ्य़ा देउन तिची हत्या केली. या बाबत कौसर च्या आई वडीलानी जलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली कि कौसर हिला गोळ्या देउन १४ रोजी रात्री हत्या केली आहे. पोलीसानी गुन्हा नोंद करून घेउन पती रियाज अहमद, व सासू बानूबी याना अटकेकी आहे. इतर नातेवाईक फरार आहेत. या घट्नेमूळॆ एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.