• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्योजक दमाणी, पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्यासह पाचजण सोन्नलगी पुरस्काराने सन्मानित

Yes News Marathi by Yes News Marathi
January 13, 2024
in मुख्य बातमी
0
उद्योजक दमाणी, पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्यासह पाचजण सोन्नलगी पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
1
VIEWS
  • सोन्नलगी पुरस्कार कार्यक्रमात विमानसेवा अन आयटी पार्कची मागणी

सोलापूर : सोलापूर आणि महाराष्ट्रात आपल्या कर्तुत्वाने आपली सिध्दता दाखवली अशा गुणीजणांना सन्मान सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून चाकोते परिवाराकडून करण्यात आला याचा आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये झालेल्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण शुक्रवारी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीपीठाचे श्री श्री श्री 1008 जगदगुरू ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी होते.

आपल्या क्षेत्रात काम करताना समाजाला नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्यांचा सन्मान करणे योग्यच आहे आणि सोलापूरमधील अशीच काही कर्तव्यतत्पर अधिकारी, पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना निवडून त्यांच्या कामाला प्रतिष्ठा देण्याच्या दृष्टीने चाकोते परिवाराने सोन्नलगी पुरस्कार देवून गौरव केला आहे. ही परंपरा चांगली आहे आणि त्याची जोपासना माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली त्याचा आनंद आहे असेही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. समाजात निस्वार्थ काम करून समाजाची सेवा करणाऱ्यांचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो, माजी आमदार बाबुराव चाकोते यांचा वारसा विश्वनाथ चाकोते आणि त्यांचे परिवाराने सुरू ठेवला आहे हे विशेष आहे. असे आर्शीवचन काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांनी दिले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले नंतर विश्वशंकर चाकोते यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत बोलून सोलापूरमध्ये अनेक गुणवंत आहेत त्यांचा उपयोग सोलापूरच्या विकासासाठी व्हावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वशंकर चाकोते यांनी सांगितले. सोलापूरच्या विकासासाठी माजी आमदार बाबुराव चाकोते आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच सोलापूरला आज पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनी ते सोलापूर पहिली पाईपलाईन शिंदे साहेबांनी आणली आता लोकसंख्या वाढत असल्याने पुन्हा दुसऱ्या पाईपलाईनसाठीही निधीची तरतूद शिंदे साहेबांनी केली आहे. हे व्हिजन असलेले सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच सोलापूरचा विकास झाला आहे असे माजी आमदार, माजी महापौर विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रिडा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सोन्नलगी रत्न पुरस्कार उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांना देण्यात आला. दमाणी यांच्या लग्नाला 70 वर्ष झाले त्यानिमित्त काशीजगदगुरू आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दमाणी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सोन्नलगी गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांना देवून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सोन्नलगी सरस्वती पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना गौरवण्यात आले. त्याचबरोबर सोन्नलगी धन्वंतरी पुरस्कार आहारतज्ञ सोनाली घोंगडे यांना तर सोन्नलगी अन्नपुर्णा पुरस्कार रॉबीनहूड आर्मीचे हिंदुराव गोरे यांना देण्यात आला. सत्कारमुर्तींच्या अंगावर पारंपारिक बाराबंदी घालण्यात आली आणि विशेष म्हणजे सत्कार करणारे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पाहुण्यांनी अंगावर बाराबंदी पोषाख घातला होता. शाल श्रीफळ, पुष्पहार, डो्नयावर पगडी, स्मृती चिन्ह आणि प्रतिकात्मक नंदीध्वज देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरमध्ये जे जे विकास झाले ते सर्व सुशीलकुमार शिंदे साहेबांनीच केले. सोलापूरमध्ये आयटी पार्क आणि विमानसेवा यायला पाहिजे असेही त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामधून स्वर्गिय बाबुराव चाकोते यांनी सोलापूरच्या शेतकऱ्यापासून कामगारांपर्यत विकासाची गंगा कशी पोहोचवली याची माहिती सांगितली. तृप्ती अंधारे यांनी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन या पुरस्काराने मिळाले असल्याचे सांगितले तर आहार तज्ञ सोनाली घोंगडे यांनी चांगले आहार हे चांगली पिढी घडवते असे आपल्या मनोगतामधून सांगितले. या कार्यक्रमात स्वागत गीत आणि समारोपाचे गीत वीणा बादरायणी यांनी गायले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. शेवटी आभार विश्वराज चाकोते यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, सुप्रिता विश्वनाथ चाकोते, नम्रता चाकोते, पद्मावती चाकोते, भिमाशंकर चाकोते, रंजिता चाकोते,पुष्पा मदन चाकोते, भिमाशंकर बिराजदार, कॉग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, अशोक भिंगारे, चंद्रशेखर नागणसुरे, डॉ. नसिमा पठाण, सरस्वती चाकोते प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा पवार, प्रिस्कीला गायकवाड, मल्लिकार्जुन गुरव, सिध्देश्वर कणगी, निलकंठप्पा कोनापुरे, राजेंद्र मायनाळ, केदार उंबरजे, रेणसिध्द अवजे, संगम रघोजी,प्रभाकर विभुते, वैभव बरबडे, दशरथ वडतिले, चन्नवीर दुलंगे, बाळासाहेब माडेकर, बसवराज रोडगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यांना देण्यात आला पुरस्कार
उद्योजक प्रेमरतन दमाणी, पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी, आहारतज्ञ् सोनाली घोंगडे, रॉबिनहूड आर्मीचे हिंदुराव गोरे, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांना सोन्नलगी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सोन्नलगी पुरस्कार कार्यक्रमात विमानसेवा अन आयटी पार्कची मागणी
चाकोते परिवाराच्या सोन्नलगी पुरस्काराचे वितरण होत असताना पुरस्कारप्राप्त उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांनी सोलापूरला पहिल्यांदा आल्यानंतर आणि आता अनेक बदल झाले. इतर शहरे मोठ्याप्रमाणात पुढे गेलेले आहेत परंतु सोलापूरला पुण्याला जसे हिंजवडी आहे तसेच सोलापूरला आयटी पार्क आणि विमानसेवा आवश्यक आहे अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर केली.

Previous Post

पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक शासकीय विभागाने समन्वय ठेवून काम करावे–जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

आदित्य केवटे मिस्टर फेस ऑफ सोलापूर तर अपूर्व उपाध्ये मिस फेस ऑफ सोलापूर

Related Posts

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
मुख्य बातमी

एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे-विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

September 8, 2026
खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!
मुख्य बातमी

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
Next Post
आदित्य केवटे मिस्टर फेस ऑफ सोलापूर तर अपूर्व उपाध्ये मिस फेस ऑफ सोलापूर

आदित्य केवटे मिस्टर फेस ऑफ सोलापूर तर अपूर्व उपाध्ये मिस फेस ऑफ सोलापूर

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026