काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. वडेट्टीवार यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांचे संदेश येऊ लागले आहे. मराठ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांना धमकीचे संदेश येत आहेत. याबाबत वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.