• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा होणार
0
SHARES
0
VIEWS

1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर :- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी 01 ऑगस्ट (महसूल दिन) ते 07 ऑगष्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असून, या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखली जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

“महसूल सप्ताह” निमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून, महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच महाराजस्व अभियानातंर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे. जमीन महसूल अधिनियम कलम 155 खालील ई- हक्क पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तलाठयामार्फत निकाली काढणेची कार्यवाही करण्यात येणार आहे. महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी युवा संवाद अतर्गंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रांचे तत्काळ वितरण महाविद्यालय स्तरावर केले जाणार आहेत. विविध घटकांतील लाभार्थी विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व कार्यक्रमाबाबत माहितीपत्रके शाळा, महाविद्यालयांमध्ये वितरीत करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे अद्ययावत करणे यासाठी विशेष मोहिमेर्तंगत शाळेच्या ठिकाणी, स्वस्त धान्य दुकान, बँक, पोष्ट कार्यालय येथे आधार मशीन्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हयातील शैक्षणिक संस्था तसेच मंडल स्तरावर व तालूका स्तरावर दाखले वाटपासाठी शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच दिनांक 03 ऑगस्ट 2023 रोजी एक हात मदतीचा या अतर्गंत मान्सुन पुर्व व मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस,अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना देय असलेल्या सोई सुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पिक विम्यासाठी विविध दाखले तत्काळ तलाठीस्तरावर प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येक मंडळ मुख्यालयामध्ये महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. दि.04 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमार्तंगत महसूल अदालतींचे आयोजन करुन सर्व स्तरावरील अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. सलोखा योजनेंतर्गत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिरे आयोजन करण्यात येणार आहेत. आपले सरकार या पोर्टलवर तक्रारी निकाली काढणेबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. दि. 05 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमार्तंगत सैनिकांच्या विविध अडीअडचणींबाबत आढावा घेऊन तातडीने निराकरण येईल तसेच जमिनीचे तंटे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

तसेच 06 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील महसूल संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणेत येतील. दिनांक 07 ऑगस्ट रोजी महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह निमित्त घेतलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले.

Tags: August 1celebrateddistrictRevenue Week
Previous Post

राज्य सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना जाहीर

Next Post

महापालिकेचा ‘स्मार्ट’ एल इ डी करार वादाच्या भोवऱ्यात; कराराची ‘स्थायी’ मध्ये होणार झाडाझडती

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
महापालिकेचा ‘स्मार्ट’ एल इ डी करार वादाच्या भोवऱ्यात; कराराची ‘स्थायी’ मध्ये होणार झाडाझडती

महापालिकेचा 'स्मार्ट' एल इ डी करार वादाच्या भोवऱ्यात; कराराची 'स्थायी' मध्ये होणार झाडाझडती

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026