• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्याच्या 349.87 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2020
in मुख्य बातमी
0
जिल्ह्याच्या 349.87 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
0
SHARES
0
VIEWS

एकशे सोळा कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करणार : पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठीच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या 349.87 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीची आज नियोजन भवन येथे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खासदार जयसिध्देश्वर स्वामी, खासदार ओमराजे निबांळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सोलापूर महानगरपालिका आयुक्त दीपक दराडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे व्यासपीठावर उपस्थित होते.

सन 2020-21 मधील सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी यंत्रणांनी 667.27 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र नियोजन समितीने 349.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. मात्र जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेऊन योजनेसाठी 116 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरवातीस इतिवृत्तास आणि इतिवृत्ताच्या केलेल्या अनुपालनास मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मिलींद शंभरकर यांनी 2019-20 मधील खर्चाचा आढावा घेतला. जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी 11.46 कोटी व आद‍िवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनेसाठी 26 लाख रुपयांच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

बैठकीत माळशिरस तालुक्यातील मौजे कचरेवाडी येथील तुळजाभवानी देवस्थान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे रानमसले येथील श्री क्षेत्र महिबुब सुबानी बाबा देवस्थान आणि बार्शी येथील भगवंत मंदीरास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

बैठकीस सर्वश्री आमदार बबनदादा शिंदे, भारत भालके, प्रणिती शिंदे, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, राम सातपुते, यशवंत माने, सचिन कल्याणशेट्टी, रामहरी रुपनवर, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद सदस्य बळीरामकाका साठे, उमेश पाटील, सुभाष माने, नगरसेवक आनंद चंदनशिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हा वार्षिक योजना 2019-20 प्राप्त निधी व खर्च विवरण (रुपये कोटीत)

 

अ.क्र बाब अर्थसंकल्पीत तरतूद 60 टक्के प्रमाणे प्राप्त निधी निधी वितरण झालेला खर्च

(बीडीएस प्रमाणे)

प्राप्त तरतूदशी खर्चाची टक्केवारी
01 जिल्हा वार्षिक योजना

(सर्वसाधारण)

347.00 208.10 180.41 149.07 72%
02 अनुसूचित जाती उपाययोजना 147.52 88.51 80.39 76.70 87%
03 अदिवासी  क्षेत्राबाहेरील उपाययोजना 5.08 3.05 1.09 0.69 26%
  एकूण 499.60 299.66 261.89 226.46 76%
Previous Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट

Next Post

अधीक्षक संजय कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
Next Post
अधीक्षक संजय कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

अधीक्षक संजय कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026